पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

| Updated on: Nov 23, 2021 | 11:38 AM

पिंपरी-चिंचवडमधील अंमली विरोधी पथकाला भुजबळ चौकात दोघेजण गांज्या घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथे सापाळा लावला. ठरलेल्या वेळेनुसार दोघेही तिथे आले. त्यावेळी त्यांच्या हातात प्रवाशी बॅग होती . या बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गांजा आढळून आला.

पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो  गांजा  जप्त ; दोघांना अटक
Cannabis
Follow us on

पिंपरी-  गुन्हेगारीसाठी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा पकडण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील अंमली विरोधी पथकाने ही कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं भुजबळ चौकात ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी बाळू महादेव वाघमारे (वय 31 , रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय 23, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सापळा रचून केली अटक
पिंपरी-चिंचवडमधील अंमली विरोधी पथकाला भुजबळ चौकात दोघेजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथे सापाळा लावला. ठरलेल्या वेळेनुसार दोघेही तिथे आले. त्यावेळी त्यांच्या हातात प्रवाशी बॅग होती . या बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गांजा आढळून आला. या गांजाची किंमत तब्बल 7 लाख 54 हजार 575 रुपये इतकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोघेही प्रवाशी बॅगमध्ये गांज्या आणत त्याची विक्री करत होते.

सोन्याचे ब्रेसलेट केले गहाळ
दुसरीकडे चाकण येथे सोने खात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांची नजर चुकवत सोन्याचे ब्रेसलेट गहाळ केलं आहे. याप्रकरणी सुशील रामनिवास वर्मा ( रा. चाकण) यांनी अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या ब्रेसलेटची किंमत 35हजार रुपये आहे. संबंधित महिलेने दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने हात ब्रेसलेट घातले त्यानंतर हात चालाखी करत ते पर्समध्ये घातले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तिथून पोबारा केला. मात्र दुकानात गर्दी असल्याने कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात येण्यास वेळ लागला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा

Ganpatipule Angaraki Sankashti | एसटी संपाचा फटका, गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली

Aurangabad: नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटणार! जिल्हा परिषदेत संभाजीनगर नावाचा प्रस्ताव मंजूर, आता केंद्राच्या मंजूरीची प्रतीक्षा!

Mantra Chanting | संकटांपासून लांब राहायचंय, तर या 12 नामांचा रोज जप करा, संकटमोचन मदतीला धावून येतील