शेजारणीने शिवीगाळ केली, 11 वर्षाच्या मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

कांबळे मायलेकी आणि मयत मुलाचे कुटुंबीय शेजारी शेजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात कोणत्या तरी कारणातून वाद आहेत.

शेजारणीने शिवीगाळ केली, 11 वर्षाच्या मुलाने उचलले हे टोकाचे पाऊल
पुण्यात 11 वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवले
Image Credit source: TV9
वैजंता गोगावले | Updated on: Nov 03, 2022 | 7:59 PM

पुणे : शेजारणीने शिवीगाळ केली म्हणून एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन खडक पोलीस ठाण्यात मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चंद्रकांत कांबळे आणि साधना चंद्रकांत कांबळे अशी आरोपी मायलेकींची नावे आहेत.

दोन्ही कुटुंबात आधीपासूनच वाद

कांबळे मायलेकी आणि मयत मुलाचे कुटुंबीय शेजारी शेजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात कोणत्या तरी कारणातून वाद आहेत. याच वादातून आरोपी मायलेकी मयत मुलाचा राग राग करायच्या.

मायलेकिंनी शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात मुलाचे कृत्य

मयत मुलगा 11 ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी महिलांच्या घरी गेला होता. यावेळी विद्या कांबळे आणि साधना कांबळे या मायलेकिंनी त्याला शिवीगाळ केली. यामुळे मुलगा चिडला. घरी येऊन रागाच्या भरात मुलाने गळफास घेत आत्महत्या केली.

आई-वडिलांना मानसिक धक्का

मुलाचे वडिल एका कंपनीत कामगार आहेत, तर आई गृहिणी आहे. एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने मुलाच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. या घटनेनंतर कुटुंब मानसिक धक्क्यात होते, त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला.

याप्रकरणी आज खडक पोलीस ठाण्यात विद्या कांबळे आणि साधना कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोणीकंदमध्ये फटाके फोडण्यावरुन तुफान राडा

पुण्यात फटाके फोडण्यावरुन दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना आज घडली आहे. वादातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाच्या घरात जाऊन तोडफोड केल्याची घटना घडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us