महिन्याला २० टक्के रिटर्नचे आमिष पडले महागात, तीन कोटी रुपये गमावले

| Updated on: Jan 29, 2024 | 8:22 AM

Pune Crime News | पुणे शहरात फसवणुकीचा मोठा प्रकार घडला आहे. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिन्याला २० टक्के रिटर्नचे आमिष पडले महागात, तीन कोटी रुपये गमावले
Follow us on

अभिजित पोते, पुणे, दि.29 जानेवारी 2024 | फसवणुकीचे विविध फंडे वापरुन अनेकांना गंडवले जात आहे. त्यानंतर आमिषाला बळी पडून फसवणूक होण्याचे प्रकार कमी होत नाही. आता पुणे शहरात फसवणुकीचा मोठा प्रकार घडला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एक तरुण त्याचे मित्र आणि नातेवाईकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच तपास पुणे पोलिसांनी सुरु केला आहे.

काय होती योजना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव गायकवाड आणि इतरांनी दिगंबर गायकवाड यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगितले. या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणार असल्याचे आमिष दिले. तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर दर महिन्याला २० टक्के रक्कम मिळणार आहे. इतके रिटर्न कोणत्याही गुंतवणुकीतून मिळत नाही. यामुळे दिंगबर गायकवाड यांनी विश्वास ठेवत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

सुरुवातील दिली रक्कम

दिगंबर गायकवाड यांचा विश्वास संपादीत करण्यासाठी आरोपींनी गुंतवणुकीवर परतावा देण्यास सुरुवात केली. आरोपींनी गायकवाड यांच्या बँक खात्यात ३ लाख २० हजार रुपये जमा केले. त्यामुळे गायकवाड आणि त्यांच्या मित्र आणि नातेवाईक गुंतवणूक सुरु केली. एकूण २० जणांनी या कंपनीत दोन कोटी ८५ लाखांची गुंतवणूक केली. इतकेच नव्हे तर ४० लाख रोख स्वरूपात सुद्धा दिले. परंतु आरोपींनी कोणताही परतावा न देता तीन कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा

या आरोपींवर गुन्हा दाखल

दिगंबर गायकवाड यांना आपण फसवले गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात हनुमंत तुकाराम मोरे, नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते, अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण, शशिकला मारुती वादगावे आणि सुरेश गोरख कुंभार यांचा समावेश आहे.