MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक
Jitendra Awhad
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 8:40 AM

पुणे : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत.

ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आव्हाड?

म्हाडाच्या परीक्षांच्या संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या, असे ट्विट देखील आव्हाड यांनी केले आहे. ”म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत” असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय 

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा  आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या 

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जानेवारीमध्ये होणार परीक्षा, जितेंद्र आव्हाडांची माहिती