Video : सोमाटणे फाट्यावर चोर-पोलिसांची झटापट! चोरांच्या चाकूहल्लाला पोलिसांचं बंदुकीनं प्रत्युत्तर

| Updated on: Jun 04, 2022 | 1:49 PM

Pimpri Chinchwad Crime News: मुंबई-पुणे महामार्गावर गाडी चोरी करून मुंबईकडे जाणाऱ्या चोरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी चोरांनी पोलिसांवरच चाकू हल्ला केला.

Video : सोमाटणे फाट्यावर चोर-पोलिसांची झटापट! चोरांच्या चाकूहल्लाला पोलिसांचं बंदुकीनं प्रत्युत्तर
फिल्मी स्टाईल झटापट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad News) येथील सोमाटणे फाटा (Somatane Fata) येथील टोल जवळ पोलीस आणि चोरांमध्ये झडापट झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली. टोल नाक्यावर पोलीस आणि चोरांमधील थरारनाट्य पाहून टोल नाक्यावर असलेले कर्मचारीदेखील धास्तावले होते. मुंबई-पुणे महामार्गावर गाडी चोरी करून मुंबईकडे जाणाऱ्या चोरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी चोरांनी पोलिसांवरच चाकू हल्ला केला. पोलीस कर्मचारी प्रदीप आणि निशांत काळे रास्ती कर्तव्यावर होते. तेव्हा त्यांना चिखलीकडून तळेगावकडे जात असताना एका व्यक्तींने आपली चार चाकी चोरल्याची माहिती दिली. त्या नुसार दोघांनी सोमाटने फाटा इथं पोलिसांना वायरलेसवर माहिती देत गाडी अडवण्यास सांगितले. दोघे तिथं पोहचले असता चोरट्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात पोलीस कर्मचारी गुट्टे जखमी झाले. अखेर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने चोरांवर बंदूक रोखली. तेव्हा चोरट्याने गाडी आणि मोबाईल तिथेच ठेवून पळ काढला. पोलिस डोंगर भागात चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलंय.

नेमकं काय घडलं?

कार चोरीची तक्रार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं गंभीर दखल घेतली. चोरटे सोमाटणे येथील टोलनाक्यावरुन जाणार असल्याचं कळताच पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण शातीर चोरांनी पोलिसांच्या हातावरुन तुरी देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

चोर पोलिसात झटापट

यावेळी पोलीस आणि चोरांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी चोरांना सरेंडर होण्याचं आवाहन केलं. पण चोरांनी चाकू काढला आणि पोलिसांवरच भिरकावला. यात एक पोलीस जखमी झाला. हा सगळा थरार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी गोंधळ आणि आरडारओरडा झाल्याचं समजात टोल नाक्यावरही कर्मचारीही धास्तावले होते. चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र असल्यानं टोलवर असलेले कर्मचारीहीही घाबरुन गेले.

अखेर पोलिसांनी पर्याय नसल्यानं बंदूक काढली आणि चोरट्यांवर ताणली. तेव्हा आता आपल्यासमोर काही पर्याय नसल्याचं कळत पोलिसांनी चाकू म्यान करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी चकवा देत चोरट्यांनी पळ काढला. पण पळ काढण्याआधी चोरलेली गाडी आणि मोबाईल चोरांनी तिथेच सोडली. टोल शेजारी डोंगर भागातून चोरट्यांनी धाव घेतली आणि पसार झाले.

या घटनेनंतर आता पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, कर्तव्यावस असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचं आयुक्त अंकुश शिंदे यांनी कौतुक केलंय.