वडिलांसोबत संबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, संतापलेल्या पतीने केले ‘हे’ कृत्य

पीडित महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. तसेच त्याच्या डोक्यावर कर्जही होते. याचा फायदा घेत सासऱ्याने मला तुझे वेड लागले आहे म्हणत सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली.

वडिलांसोबत संबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, संतापलेल्या पतीने केले हे कृत्य
कल्याण-डोंबिवलीमध्‍ये अंधश्रध्देचा कळस
Image Credit source: Google
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 14, 2022 | 7:37 PM

मावळ : वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास बबनवर घोजगे असे 34 वर्षीय पतीचे तर बबनवर वरसु घोजगे असे 75 वर्षीय सासऱ्याचे नाव आहे.

मजबुरीचा फायदा घेत सासऱ्याने केली शरीरसुखाची मागणी

पीडित महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. तसेच त्याच्या डोक्यावर कर्जही होते. याचा फायदा घेत सासऱ्याने मला तुझे वेड लागले आहे म्हणत सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली.

तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद लागलाय. तो कर्ज फेडू शकत नाही. मी तुमचे कर्ज फेडतो, तसेच जमिनही नावावर करुन देतो, असे म्हणत सासऱ्याने सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिच्या शरीराला अश्लील स्पर्शही केला.

नकार देताच पतीने केली मारहाण

सदर बाब महिलेने पतीला सांगितली असता पतीनेही वडिलांच्या मनाप्रमाणे वाग, त्यांना खूश कर. ते आपले कर्ज फेडणार आहेत, त्यामुळे त्यांना खूश कर. मला तुझ्यात रस राहिला नाही, असे सांगितले. मात्र महिलेने नकार देताच पतीने तिला मारहाण केली.

यानंतर पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार तळेगाव पोलिसांनी पती आणि सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us