पुणे पोलिसांचा पॅटर्नचं वेगळा, जिथं कोयता घेऊन राडा केला तिथ नेऊनचं धडा शिकवला, पुणे नवी कारवाई कोणती?

| Updated on: Jan 26, 2023 | 8:15 AM

कोयता हातात घेऊन दहशत माजविणारे गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव यांच्या पुणे पोलीसांनी कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांचा पॅटर्नचं वेगळा, जिथं कोयता घेऊन राडा केला तिथ नेऊनचं धडा शिकवला, पुणे नवी कारवाई कोणती?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यात सध्या कोयता गॅंगचा एकप्रकारे ट्रेंडचं सुरू आहे. गुंड हातात कोयता घेऊन धुडगूस घालतात, नंतर पोलीस त्या कोयता गॅंगच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करतात. जिथं धुडगूस घातला त्या परिसरात नेऊन धिंडही काढतात. त्यामुळे पुणे पोलिसांचा हा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. आता पुणे पोलीसांनी आणखी एक कारवाई केली आहे. पुण्यात कोयता गँगची आणखीन एक धिंड काढल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील भैरवनाथ मंदिराजवळ काही गुंडांनी धुडगूस घातला होता. यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. हे गुंड इथवरचं थांबले नाही त्यांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वारही केले होते. त्याच सराईत गुंडांना पुणे पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सराईत तीन गुंडांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली आहे.

कोयता हातात घेऊन दहशत माजविणारे गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव यांच्या पुणे पोलीसांनी कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडाना पोलिसी खाक्या दाखविला आहे, त्यामध्ये गुंडांची धिंड काढण्यात आली आहे.

ज्या ज्या परिसरात या गुंडांनी धुडगूस घातला, त्याच परिसरात धिंड काढणे आणि चोप देण्याची मोहीमच पुणे पोलीसांनी हाती घेतली आहे.

गुंडगिरी, गुन्हेगारीच्या घटनांना अटकाव करण्यासाठी पुणे पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून संबंधित गुन्हेगारांची धिंड काढली जात आहे.

तरीही गुन्हे कमी होत नसल्याचं पाहायला मिळत असून पुणे पोलीसांच्या कारवाई मात्र यानिमित्ताने चर्चेत असून अधिक कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.