पुण्यात अशोक खरात सारखा कारनामा; कथित अध्यात्मिक गुरू तरुणींकडून मागवायचा अर्धनग्न फोटो अन्…
पुण्यात अशोक खरात सारखा कारनामा समोर आला आहे. या कथित अध्यात्मिक गुरू तरुणींकडून अर्धनग्न फोटो मागवल्याचे समोर आलं आहे.

पुण्यात एका भोंदूबाबाचं हादरवणारं हत्याकांड उघडकीस आलं आहे. 23 वर्षीय भोंदूने तरुणीला भीती दाखवून अर्धनग्न फोटो मागवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शरीरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा दावा करून तरुणींकडून फोटो मागवायचा. या नराधमाचं कांड उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अशोक खरात सारख्या या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
दिव्य जितेंद्र परमार असे अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याने 22 वर्षीय तरुणीची फसवणूक केली. या भोंदूने कॉलेजमध्ये असताना स्वत:ला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ असल्याचा सांगायचा. त्याने सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. सोशल मीडियावर एक चॅनेल देखील सुरू केलं होतं. खंरतर त्याने 18 व्या वर्षांपासून कांड सुरू केले होते. तो सोशल मीडियावरील कोवळ्या मुलींना हेरायचा. हाच नराधम लोकांमध्ये जाऊन व्याख्याने देखील देऊ लागला होता. तरुणी संपर्कात आल्यानंतर त्यांना व्यायामाच्या टिप्स द्यायचा. व्यायामाच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यानंतर अर्धनग्न फोटोची मागणी करायचा. तरुणींनी फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवायचा.
कोंढवा भागातून भोंदूबाबाला अटक
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तरुणींशी संपर्क साधायचा. त्याने आध्यात्मिक गुरू सांगून तरुणींशी संवाद वाढवायचा. व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचा, असे आमिष द्यायचा. पुण्यातील हा भोंदूबाबा मोबाईलवरून अर्धनग्न फोटो मागवायचा. अशाच एका पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली. त्याचा मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. आता फोटो, मेसेज,व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारावर तपासणी सुरू झाली आहे. या भोंदूने आणखी किती महिला आणि तरुणींना जाळ्यात ओढले आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ओरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूला अटक केल्यानंतर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.