
इंदौरमधील राजा रघुवंशी याच्या हत्येला आता 24 दिवस उलटले आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह पाचही आरोपी सध्या या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतात. आता याच दरम्यान, राजाच्या हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राजा आणि सोनम हे दोघेही तेथील एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले, तेव्हा ते दोघे ट्रेकिंग करत होते. राजा आणि सोनम दोघेही ट्रेकला जात होते. त्याच वेळी एक पर्यटक व्हिडिओ बनवत होता. राजा आणि सोनम देखील त्याच्या कॅमेऱ्यात कॅप्चर झाले. राज्याच्या हत्येच्या काही काळ आधीचाच हा व्हिडीओ असून त्याचे अखेरचे काही क्षण त्यात कैद झाले.
या व्हिडिओमध्ये सोनम पुढे चालताना दिसत होती तर राजा तिच्या मागे होता. तेव्हा सोनमने पूर्ण हातांचा पांढरा टी-शर्ट तर राजानेही पांढरा स्लीव्हलेस टी-शर्ट घातला होता. खरंतर, शिलाँग फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर दावा केला आहे की, डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो जेव्हा व्हिडिओ बनवत होता, तेव्हाच राजा आणि सोनम रघुवंशी हे दोघेही त्याच्या फ्रेममध्ये कैद झाले होते. दोघेही वरच्या दिशेने जात होते. तेव्हा सोनमने जो पांढरा फुल्ल हातांचा शर्ट घातला होता, तोच नंतर राजा रघुवंशीच्या मृतदेहाशेजारी सापडला, असा दावा केला जात आहे.
पर्ययटकाने शेअर केला व्हिडीओ
देव सिंह नावाच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 23 मे 2025 रोजी मी मेघालय डबल डेकर रूट ब्रिजच्या सहलीला गेलो होतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. काल मी तो व्हिडिओ पाहत होतो आणि तेव्हाच मला इंदौरमधील त्या जोडप्याचे रेकॉर्डिंग सापडले. सकाळे 9: 45 झाले होते, आम्ही खाली जात होतो तेव्हा आणि नोगरीट गावात रात्र घालवून राजा-सोनम वरच्या दिशेने जात होते. मला वाटतं की हे या दोघांचे शेवटचे रेकॉर्डिंग होते. या मृतदेहाशेजारी सापडला तोच पांढरा शर्ट सोनमने घातला होता. मला आशा आहे की यामुळे मेघालय पोलिसांनाही हे प्रकरण सोडवण्यास मदत होईल, असे त्या पर्यटकाने या व्हिडीओसबोत लिहीलं आहे.
कसा दिसत होता राजा ?
देव सिंहने व्हिडिओमध्ये राजा रघुवंशीबद्दलही लिहीलं आहे. ” आता मी जेव्हा व्हिडीओमध्ये राजाला पाहिलं तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. तो अगदी साधा, सामान्य दिसत होता. पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती ” असंही त्याने पोस्टमध्ये नमूद केलं. माझ्याकडे आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये इंदूरमधील आणखी 3 लोक देखील दिसत आहेत, ज्यांनी या दोघांच्या 20 मिनिटे आधी प्रवास सुरू केला आणि पोलिसांनी त्यांना पकडले, असेही त्याने लिहीलं. याप्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.