टीएमसी खासदाराच्या घराच्या रेकीचं मुंबई कनेक्शन, माहिममध्ये पोलिसांची झाडाझडती; 26/11 हल्ल्याचं कनेक्शन काय ?

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील माहिम येथून राजाराम रेगे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. माहिममध्ये कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतयं. मुंबईसह संपूर्ण देशाला हादररवणाऱ्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीस देखील राजाराम रेगे याचं नाव समोर आलं होतं. डेव्हिड हेडलीच्या संपर्कात असल्याने राजाराम रेगे याची तेव्हा चौकशी करण्यात आली होती.

टीएमसी खासदाराच्या घराच्या रेकीचं मुंबई कनेक्शन, माहिममध्ये पोलिसांची झाडाझडती;  26/11 हल्ल्याचं कनेक्शन काय ?
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 9:50 AM

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील माहिम येथून राजाराम रेगे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. माहिममध्ये कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतयं. मुंबईसह संपूर्ण देशाला हादररवणाऱ्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीस देखील राजाराम रेगे याचं नाव समोर आलं होतं. डेव्हिड हेडलीच्या संपर्कात असल्याने राजाराम रेगे याची तेव्हा चौकशी करण्यात आली होती.

सोमवारी कोलकाता पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं आणि माहिम मधून राजाराम रेगेला त्यांनी अटक केली. टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्याचा आरोप रेगे याच्यावर आहे. काही काळ तो कोलकातामध्ये तळ ठोकून होता. अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पीएचा फोन नंबरही त्याने मिळवला होता. रेगे याच्याकडून मोठ्या योजनेचं प्लानिंग सुरू होतं असं कोलकात पोलिसांचं म्हणणं आहे.

26/11 चा आरोपी डेव्हिड हेडली आणि राजाराम रेगे, कनेक्शन काय ?

मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या हल्ल्यापूर्वी डेव्हिड हेडली मुंबईत आला होता, आणि त्याने मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती. त्यावेळेस तो राजाराम रेगे याला भेटला होता. हेडलीने शिकागो न्यायालयात खटल्यात फिर्यादी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. मध्य मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात जाऊन रेगे याची भेट घेतल्याचे हेडलीने सांगितले होते. त्यावेळी हल्ल्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी राजाराम रेगेची चौकशी केली होती.

आता याच राजाराम रेगेचं नाव पुन्हा समोर आलं आहे. तो कोलकात्यामध्ये एका हॉटेलमध्ये बराच काळ रहता होता. तेथे वास्तव्य करून तो मोठ्या घातपाताची योजना आखत होता. त्याने टीएमसी खासदार बॅनर्जी आणि त्यांच्या पीएचा नंबरही मिळवला. तसेच तो काही लोकांच्या संपर्कात होता, अशी माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला माहिम येथून अटक केली. त्यामुळे राजाराम रेगे नक्की कुठलं षडयंत्र रचत होता, त्याचं काय प्लानिंग काय होत याची माहिती लवकरच तपासत उघड होईल, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.