Religious conversion : महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला

हिंदुंच्या संपूर्ण गटाचच धर्मांतर केलं जाणार होतं. हे सर्व हिंदू ख्रिश्चन धर्म स्वीकारणार होते. त्यासाठी सर्वांना बसमध्ये बसवून उन्नाव येथील चर्चमध्ये नेलं जात होतं.

Religious conversion : महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला
Religious conversion
| Updated on: Apr 01, 2024 | 12:26 PM

धर्म परिवर्तनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एक-दोन नाही, हिंदुंच्या संपूर्ण गटाचच धर्मांतर केलं जाणार होतं. हे सर्व हिंदू ख्रिश्चन धर्म स्वीकारणार होते. त्यासाठी सर्वांना बसमध्ये बसवून उन्नाव येथील चर्चमध्ये नेलं जात होतं. तिथे सर्वांच धर्मांतर केलं जाणार होतं. धर्माच्या सौदागरांनी त्या बदल्यात महिन्याला 50 हजार रुपये देण्याच आश्वासन दिलं होतं. पण पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसेस थांबवल्या व दोन आरोपींना अटक केली. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे.

नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, गंगा बॅरेज क्षेत्रातून दोन बसेस उन्नावच्या दिशेने चालल्या आहेत. यात अनेक लोक होते. सर्व हिंदू होते. पैशाच्या मोबदल्यात त्यांना ख्रिश्चन बनवण्यासाठी उन्नाव येथील चर्चमध्ये नेल जात होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. दोन्ही बसेस रस्त्यात रोखल्या. दोन आरोपी सर्वांना चर्चमध्ये घेऊन चाललेले. त्यांचा ख्रिश्चन धर्मात प्रवेश होणार होता.

काय आमिष दाखवलेलं?

बसमधल्या लोकांनी सांगितलं की, “याच दोघांनी आमिष दाखवलं होतं की, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास महिना 50 हजार रुपये मिळतील” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बजरंग दलाचे काही लोक तिथे पोहोचले. त्यांना सुद्धा माहिती मिळाली होती. बराचवेळ तिथे गोंधळ झाला. नंतर पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात गेले. दोन्ही आरोपींची नंतर सुटका झाली.

अन्य सुविधा सुद्धा मिळणार होत्या

ज्यांच धर्मांतरण होणार होतं, ते सर्व गरीब कुटुंबातील होते. हिंदू धर्म सोडून ख्रिश्नच धर्म स्वीकारल्यास महिना 50 हजार रुपये मिळतील असं आमिष दाखवण्यात आलं होतं. सोबतच अन्य सुविधा सुद्धा मिळणार होत्या. म्हणून हे लोक धर्मांतरासाठी तयार झाले असं एका व्यक्तीने सांगितलं.