व्याही बनला प्रियकर! आई मुलीच्या सासऱ्यासोबत पळाली, नवरा-मुलाकडून धक्कादायक खुलासे
सध्या सासू-जावई लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर चर्चा असताना नात्याला कलंकित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एका महिलेने आई-मुलीच्या नात्याला कलंकित केलं. सुनील कुमार ट्रक चालवायचं काम करतो. ट्रक चालवायच्या कामामुळे सुनील महिनोन महिने घरापासून लांब असायचा.

सध्या सोशल मीडियावर सासू-जावई लव्ह स्टोरीची चर्चा असताना आता नात्याला कलंकित करणारं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने आई-मुलीच्या नात्याला कलंकित केलं. महिलेने मुलीच्या सासऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. आता ही महिला नवरा आणि पोटच्या मुलाला सोडून सासऱ्यासोबत पळून गेली आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमधील हे प्रकरण आहे. या प्रकाराबद्दल समजल्यानंतर परिसरात सगळेच हैराण झाले आहेत. महिलेच नाव ममता ऊर्फ विमला असल्याच सांगितलं जातय. मुलीचा सासरा शैलेंद्र ऊर्फ बिल्लूच्या ती प्रेमात पडली.
बदायू जिल्ह्यातील दातागंज क्षेत्रातील हे प्रकरण आहे. इथे सुनील कुमार ट्रक चालवायचं काम करतो. ट्रक चालवायच्या कामामुळे सुनील महिनोन महिने घरापासून लांब असायचा. फार कमीवेळा घरी यायचा. वेळो-वेळी तो पैसे आणि आवश्यक सामान पाठवायचा. पत्नी विमलाने सुनीलच्या अनुपस्थितीचा फायदा उचलला. तिने व्याह्यासोबतच अनैतिक संबंध ठेवले. आता विमला घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन व्याह्यासोबत पळून गेली आहे.
जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत पाठवलं जायचं
या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोसळून गेलय. सुनीलचा मुलगा सचिनने या नात्याची पोलखोल करताना सांगितलं की, आई अनेकदा व्याह्याना घरी बोलवायची. आम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत पाठवलं जायचं. दीर्घकाळ हे असच सुरु होतं. काही दिवसांपूर्वी आईने अचानक एक टेम्पो बोलवला. त्यात ती सर्व सामान टाकून व्याह्यासोबत निघून गेली.
सकाळी शैलेंद्र निघून जायचा
शेजारी अवेधश कुमारने सुद्धा या प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. ममता अनेकदा रात्रीच्यावेळी शैलेंद्रला घरी बोलवायची. सकाळी शैलेंद्र निघून जायचा. नातेवाईक असल्याने वस्तीतल्या लोकांना संशय आला नाही. आता हे प्रकरण समजल्यानंतर सगळेच हैराण आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
पीडित सुनीलने पोलीस ठाण्यात व्याही शैलेंद्र याच्याविरोधात तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे. क्षेत्राधिकारी के. के. तिवारी यांनी सांगितलं की, प्रकरणाचा तपास सुरु आहे. आवश्यक साक्षी-पुरावे गोळा केले जात आहेत. चौकशीनंतर कारवाई होईल.