
मध्य प्रदेशच्या इंदूरचे नवविवाहीत दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम यांची शिलांग हनीमुन ट्रीप ट्रॅजेडी चर्चेत आहे. आता २२ मे चा एक नवा सीसीटीव्ही जारी झाला असून त्यात राजा आणि सोनम शिलाँग येथील एका हॉटेलच्या बाहेर स्कुटीवरुन येताना आणि सुटकेस ठेवून त्याच स्कूटरवरुन पुन्हा फिरायला निघतानाचे दृश्य कैद झाले आहे. हीच स्कूटी राजा रघुवंशी यांच्या मृतदेहाजवळ बेवारस अवस्थेत सापडली आहे. तर सोनम यांनी जे जॅकेट परिधान केले तेच राजा रघुवंशी यांच्या मृतदेहाशेजारी सापडले. मग सोनम गेली कुठे? हा सस्पेन्स कायम आहे.
शिलाँगच्या स्थानिक ‘टी7 न्यूज चॅनल’ने एका 4 मिनिट 53 सेकंदाचा सीसीटीव्ही फूटजे जारी केला आहे. या सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसतेय की २२ मे रोजी राजा आणि सोनम या हॉटेलमध्ये सुखरुप उतरले होते. दोघांनी हॉटेलात त्यांची बॅगा ठेवल्या आणि पुन्हा ते त्याचे स्कूटीवरुन फिरायला निघाले. या फुटेजवरुन तरी त्यांचा हॉटेलमधील मुक्कामाचा २२ मे रोजीचा दिवस तरी सर्वसामान्य दिसत होता.
येथे पाहा Video:-
Honeymoon murder case: Raja-Sonam’s CCTV footage outside Shillong hotel surfaced, both seen entering, search still on… #CCTV #CCTVFootage #shilong #Sonam #Honeymoon #MadhyaPradesh pic.twitter.com/DKK3BpwsgY
— Indian Observer (@ag_Journalist) June 7, 2025
11 मे 2025 विवाह झाल्यानंतर राजा आणि सोनम 20 मे रोजी हनीमूनला मेघालयातील शिलांग गेले होते. २२ मे रोजी शिलाँगच्या मावलखियाट गावातील शिपारा होम स्टेमध्ये थांबले होते २३ मेच्या सकाळी होम स्टेमधून चेक आऊट केल्यानंतर दोघे जण पिकनिक स्पॉटवर गेले ते गायबच झाले.२४ मे रोजी त्यांची स्कूटी सोहरिम येथे लावारिस अवस्थेत सापडली. २ जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला.त्याची हत्या करुन त्याला ढकल्याचे म्हटले जात आहे.सोनमचा अजून कोणताही थांगपत्ता लागला नाही.
नवीन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासासाठी महत्वाचा ठरु शकतो. कारण राजा आणि सोनम यांच्या शेवटच्या हालचाली यात दिसत आहेत. मेघालय पोलीस, एनडीआरएफ आणि विशेष तपास पथक (SIT) या गुढ घटनेचा तपास करीत आहे.परंतू सोनम आणि राजाच्या परिवाराने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.