‘होय, सागरचा खून प्रेमप्रकरणातूनच!’ अडीच महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा, तलावात बुडण्याआधी सागरसोबत काय झालं?

5 ऑक्टोबर रोजी सागर याला संशयित आरोपींनी दुचाकीवरुन घेऊन जात त्याला जबर मारहाण केली होती. यानंतर त्याला तळ्यात ढकलून देत जीवे मारलं होतं, असा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला होता.

होय, सागरचा खून प्रेमप्रकरणातूनच! अडीच महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा, तलावात बुडण्याआधी सागरसोबत काय झालं?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 11:47 AM

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठानं एका मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या सागर मराठे या तरुणाच्या मृत्यूबाबत मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठामध्ये सुनावणी झाली. शिंदखेडा पोलिसांनी या प्रकरणी आता हत्याचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सागर मराठे या तरुणाचा अडीच महिन्यांपूर्वी तलावात बुडून मृत्यू झाला असल्याचं भासवण्यात आलं होतं. अखेर आता या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानं या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. वरुळ या गावात राहणारा सागर प्रकाश मराठे हा तरुण अडीच महिन्यांपूर्वी दगावला होता. याप्रकरणी प्रथमदर्शनी तो तलावात बुडाला असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला होता. अखेर आता या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिंदखेडा पोलिसांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी करत हत्येचा (Murder) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत. औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशानुसार आता गुन्हादेखील नोंद करण्यात आला आहे. एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सागरचं त्याच्या गावातील एका मुलीशी प्रेम असल्याचा संशय होता. मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन संशयित आरोपींनी सागरसह त्यांच्या आईलाही धमकावलं होतं. मात्र अखेर कुटुंबीयांनी मध्यस्थी करत हे सगळं प्रकरण मिटवलं होतं. दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी सागरचा अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

काय खरं? काय खोटं?

5 ऑक्टोबर रोजी सागर याला संशयित आरोपींनी दुचाकीवरुन घेऊन जात त्याला जबर मारहाण केली होती. यानंतर त्याला तळ्यात ढकलून देत जीवे मारलं होतं, असा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान, शिंदखेडा पोलिस स्थानकात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मृत सागरच्या काकांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात तक्रार अर्ज दाखल करत सागरची हत्या झाली असल्याचा दावा केला होता. तब्बल अडीच महिन्यांनंतर अखेर कोर्टात झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठानं सागरच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हत्येचं गूढ वाढलं!

औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशानुसार एकूण पाच जणांना हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप भावराव कोळी, संजय दगा सैंदाणे, भुरमल मंगल भील, सोनी मंगा पाटील आणि गट्टू सरदार मराठे यांच्यावरिोधात कलम 302, 201, 120 ब 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सागरच्या मृत्यूप्रकरणाला हत्येचं वळण लागल्यानं पोलिसांनीही संशयित आरोपींची कसून चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी आता हत्येचा छडा लावण्याचं आव्हान शिंदखेडा पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

संबंधित बातम्या :

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप