Solapur Crime : सोलापूर की “वासेपूर”? वाळू माफियांची हिंमत तर बघा! थेट सामाजिक कार्यकर्त्यालाच दाखवलं पिस्तुल

| Updated on: May 10, 2022 | 10:30 PM

सोलापूरमध्ये वाळू माफियांकडून सामाजिक कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर दाखवत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघड आहे. या ठिकाणी तक्रार करुनही कोणी दखल घेत नसल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

Solapur Crime : सोलापूर की वासेपूर? वाळू माफियांची हिंमत तर बघा! थेट सामाजिक कार्यकर्त्यालाच दाखवलं पिस्तुल
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : सोलापुरात मोठ्या प्रमाणात नद्यांचं (Bhima River) जाळं आहे. अनेक गावं या नद्यांवर अवलंबून आहेत. मात्र या नद्यांवरुन वाळू माफियांकडून वाळू उपसाही (Sand Mafia)  तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. आता तर सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका सामजिक कार्यकर्त्यांसोबत (Solapur Crime) या ठिकाणी जे घडलंय ते पाहून कुणाच्याही पायखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण सोलापूरमध्ये वाळू माफियांकडून सामाजिक कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर दाखवत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघड आहे. या ठिकाणी तक्रार करुनही कोणी दखल घेत नसल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात याआधीही असे काही धक्कादायक प्रकार समोर आले आहे. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्याने हे कधी थांबणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील घोडेश्वर गावातील ही घटना आहे. या गावातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. याबाबत गणेश चव्हाण नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे वाळू उपसा करणारे चिडले आणि हा प्रकार केल्याचे या सामाजिक कार्यकर्त्याकडून सांगण्यात आले आहे. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांकडून रिव्हॉल्वर दाखवत सामाजिक कार्यकर्त्याला अप्रत्यक्ष धकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्याने केला आहे. तीन फुटापेक्षा जास्त खड्डे न करणे, कोणत्याही प्रकारचे यंत्र किंवा मशीन वापरण्यास बंदी असूनही मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर उपसा सुरु असल्याची तक्रार केली होती. एक महिन्यापासून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरु असल्याचेही तक्रारदाराने सांगितले आहे. तलाठी कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली मात्र त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

भीमा नदीतील ठेक्यावरून वाळू उपसा

सोलापूर जिल्ह्याला भीमा नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात लाभले आहे. ही भीमा नदी पंढरपुरातूनही जाते. याच भीमा नदीच्या किणारी विठ्ठलाचे मंदिरही वसले आहे. मा६ भीमा नदीतील घोडेश्वर गावात वाळूचा ठेका सुरु आहे . मात्र या ठेक्यावरुन बेकायदेशीर आणि नियमबाह्यपणे वाळू उपसा सुरू असल्याबाबत या सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केली होती. तक्रारीनंतर वाळू माफियांकडून सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी देऊनही कारवाई झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा