Sports Material Scam : नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळा, पुराव्यांअभावी 108 जणांची निर्दोष सुटका

हा घोटाळा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजला असल्याने त्यावर राजकारण सुद्धा मोठं झालं होतं. त्या काळात महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपवर टीकासुद्धा होत होती. आज या प्रकरणाचा जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला असून यात 108 जणांची निर्दोष सुटका केली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि 101 जण निर्दोष सुटले.

Sports Material Scam : नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळा, पुराव्यांअभावी 108 जणांची निर्दोष सुटका
नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळा, पुराव्यांअभावी 108 जणांची निर्दोष सुटका
Image Credit source: TV9
सुनील ढगे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 10, 2022 | 9:33 PM

नागपूर : नागपूर महापालिकेत झालेल्या क्रीडा साहित्य घोटाळा (Sports Material Scam) प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. यात 108 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका (Released) करण्यात आली. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला. यात आताचे भाजप आमदार कृष्णा खपोडे, विकास कुंभारे यांच्यासह अनेक भाजप आणि इतर पक्षाच्या नगरसेवकांचा आणि काही कॉन्ट्रॅक्टरचा समावेश होता. महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळा ही 22 वर्ष जुनी केस असून हा घोटाळा राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजला होता. या घोटाळ्यात 108 नगरसेवक (Corporator) आणि कॉन्ट्रॅक्टरचा समावेश होता. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर नंदलाल समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुद्धा केली होती. आज त्यांच् विरुद्ध दोष सिद्ध झाला नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

हा घोटाळा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजला असल्याने त्यावर राजकारण सुद्धा मोठं झालं होतं. त्या काळात महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपवर टीकासुद्धा होत होती. आज या प्रकरणाचा जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला असून यात 108 जणांची निर्दोष सुटका केली. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि 101 जण निर्दोष सुटले.

2000 साली नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना 2000 साली भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल समितीने ठेवला होता. मात्र ज्या 108 नगरसेवक व अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध सबळ पुराव्याअभावी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याप्रकरणी सुरवातीला सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु या घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारने क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये आमदार कृष्ण खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर कल्पना पांडे, दिलीप पनकुले, किशोर पराते, विजय बाभरे, अर्चना डेहनकर यांच्यसह 99 आजी-माजी नगरसेवक व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील काही आरोपींचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें