AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या नजरेत नाना पाटेकरांना न आवडलेली भारताची पहिली Fair & lovely गर्ल आता कुठे आहे? काय करते?

अलेक्स पदमसी त्या जाहीरातीचे दिग्दर्शक होते. Fair & lovely चं लॉन्च होतं. ज्योत्सना मोहन यांच्या इंटरव्यूमध्ये नीशा सिंह यांनी काही गोष्टींचा खुलासा केलेला.

पहिल्या नजरेत नाना पाटेकरांना न आवडलेली भारताची पहिली Fair & lovely गर्ल आता कुठे आहे? काय करते?
Neesha Singh-NaNa Patekar
| Updated on: Feb 21, 2026 | 3:06 PM
Share

ग्लॅमर विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअर ऐन भरात असताना अभिनय सोडला. याच अभिनेत्रींपैकी एक आहे नीशा सिंह. फेअर अँड लवली गर्ल म्हणूनही नीशा सिंहला ओळखतात. 1980-90 च्या दशकात नीशा सिंह जाहीरातींच्या माध्यमातून वस्तू विकणारा चेहरा होता. त्यांचा अभिनयाचा प्रवास नियोजित नव्हता. फक्त नशिबाने मिळालेली संधी आणि योगायोगाने हे सर्व सुरु झालं.

कॉलेज कॅन्टीनमध्ये कोणीतरी हिंदुस्तान लीवरच्या जाहीरात कॅम्पेनच्या व्हिडिओ टेस्टसाठी तिच्याशी संपर्क साधला. अलेक्स पदमसी त्या जाहीरातीचे दिग्दर्शक होते. Fair & lovely चं लॉन्च होतं. ज्योत्सना मोहन यांच्या इंटरव्यूमध्ये नीशा सिंह यांनी काही गोष्टींचा खुलासा केलेला. मी सांगितलं मॉडलिंगसाठी मला माझ्या कुटुंबाकडून परवानगी मिळणार नाही. पण मित्र-मैत्रिणींसोबत पहायला येईन. शूटिंगच्या अखेरीस पदमसींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी विचारलं टेस्ट का नाही दिली?. मी सांगितलं मॉडलिंगची परवानगी नाही. कॅमेऱ्यासाठी मला विना मेकअप चेहरा हवाय. तू कॅमेऱ्यासमोर उभी राहशील का? असं त्यांनी विचारलं.

पण बेस्ट ब्रांड्स स्वत: यायचे

काही दिवसांनी अजय आनंद यांनी सांगितलं की, मी सिलेक्ट झालीय. वडिल ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी पदमसी स्वत: माझ्या घरी आले. तुमची मुलगी सुरक्षित राहील असा विश्वास दिला. ती जाहीरात खूप गाजली. पण वडिलांनी बंधन घातली. महिन्याला फक्त एक जाहीरात. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं यासाठी ती अट होती. मी ओवरएक्सपोज झाली नाही. मी जास्त जाहीराती करु शकले असते. चांगले पैसा मागू शकली असती. पण बेस्ट ब्रांड्स स्वत: यायचे. बॉम्बे डाइंग, लॅक्मे, नेस्कॅफे.

करिअर ऐन भरात असताना लग्न

नीशा सिंह त्यावेळी अभिनेत्रीच्या साच्यामध्ये फिट बसत नव्हती. पण ‘अंकुश’ चित्रपटाने तिचं नशीब पालटलं. कास्टिंगच्यावेळी चित्रपटाचे नायक नाना पाटेकर यांनी तिच्या कामावर शंका घेतली होती. नानांनी मला पाहताच माझा द्वेष केला. ते एन चंद्रा यांना मराठीत बोलले. वेडा आहेस का?. या मुलीला काम देणारं? तिसऱ्या दिवशी माझे रिएक्शन शॉट्स पाहून त्यांनी कौतुक केलं. चित्रपटानंतर नीशा सिंहने टीव्ही सीरियल्समध्ये काम केलं. ‘बुनियाद’ आणि भारताची पहिली इंग्रजी टीव्ही सीरीज ‘ए माउथफुल ऑफ स्काय’ ने ती घराघरात लोकप्रिय झाली. करिअर ऐन भरात असताना तिने लग्न केलं व सिंगापूरला शिफ्ट झाली.

Follow Us
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद