Delimitation Bill : दिल्लीत मोठ्या घडामोडी, ‘खूप महत्वाचं बिल येतय’, किरेन रिजिजू यांच्या स्टेटमेंटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Delimitation Bill : दिल्लीत मोदी सरकारने संसदेच विशेष सत्र बोलावलं आहे. हे सत्र बोलावल्यापासून राजकीय चर्चा, तर्क-वितर्कांचा बाजार गरम झाला आहे. त्यात संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी एक मोठ स्टेटमेंट केलं आहे.

संसदेच विशेष सत्र बोलवण्यात आल्यापासून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. आता केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे सांगितलं नाही की सरकार कोणतं बिल आणतेय, पण हे स्पष्ट केलं की, सरकार महत्वपूर्ण विधेयक आणतं आहे. “संसेदच्या विशेष सत्रात सार्थक चर्चा व्हावी तसचं संसदेचं कामकाज व्यवस्थित चालावं” असं आवाहन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांना केलं आहे.”कुठल्याही खासदाराने बेजाबाबदारपणे काहीही बोलू नये तसचं कुठल्याही पक्षाने सभागृहात गोंधळ घालू नये. सर्व खासदारांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे” असं किरेन रिजिजू म्हणाले.
किरेन रिजिजू म्हणाले की, “विशेष कामासाठी संसदेचं विशेष सत्र बोलवण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला लोकसभेत चर्चा होईल. 2 आणि 3 डिसेंबरला विधेयकावर राज्यसभेत चर्चा होईल” संसदेच्या विशेष सत्राला असंवैधानिक बोलणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली. आवश्यक विधेयक आणि राष्ट्रीय महत्वाच्या मुद्दांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात येतं.
सहमत होणं किंवा विरोध करणं ही वेगळी बाब
“विशेष सत्र बोलवण्याला असंवैधानिक ठरवणं किंवा मान्सून सत्र वेळेआधी संपवलं असं म्हणणं हा बेजबाबदारपणा आहे असं किरेन रिजिजू म्हणाले. संसदेचा मंच हा चर्चेसाठी आहे. सरकार सभागृहात जो कुठला प्रस्ताव किंवा विधेयक आणणार असेल, त्यावर सर्व पक्षांनी गांभीर्याने चर्चा करणं आवश्यक आहे. कुठल्या प्रस्तावावर सहमत होणं किंवा विरोध करणं ही वेगळी बाब आहे. पण संसदेच कामकाज चालणं गरजेचं आहे” असं किरेन रिजिजू म्हणाले.
राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता
किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या विशेष सत्रात सहभागी होण्याचं आवाहन केलं. देशाची जनता संसदेची कार्यवाही पाहत असते. म्हणजे संसदेच कामकाज व्यवस्थितरित्या चालवं ही सर्वांची जबाबदारी आहे असं किरेन रिजिजू म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता आहे. सर्व विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात नाहीयत. काही पक्ष सरकारच्या बाजूने जाऊ शकतात.
