AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भाजपने डाव टाकला! डिलिमिटेशन बिलसाठी शरद पवारांशी चर्चा; राष्ट्रवादीची भूमिका काय?

डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांशी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जत असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

अखेर भाजपने डाव टाकला! डिलिमिटेशन बिलसाठी शरद पवारांशी चर्चा; राष्ट्रवादीची भूमिका काय?
Sharad Pawar
| Updated on: Nov 27, 2026 | 2:30 PM
Share

Maharashtra Politics News: केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून आणि राज्यसभेचे २ डिसेंबरपासून सुरू होईल. या अधिवेशनामध्ये महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांसाठी केंद्र सरकार बहुमताची जुळवाजुळव करत आहे. याचबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.

भाजपच्या नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जत असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

इंडिया आघाडी विरोधात, राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात! 

इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून या विधेयकाविरोधात भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट हा विरोध राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. केंद्र सरकारने अधिवेशन बोलावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधेयकाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले नाही. नव्या विधेयकाची प्रत हाती आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. मात्र गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी पाहता शरद पवार यांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे,  आगामी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे. मात्र खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला जाणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या बैठकीला जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. मात्र यामागे राजकीय खेळी असल्याचीही चर्चा आहे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?