Gold Smuggling : 5.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, लखनौ आणि मुंबईतली मोडस ऑपरेंडी सेम

डॉक्युमेंटमध्ये, या वस्तूंची "सेक्शनल आणि ड्रम प्रकारची ड्रेन क्लीनिंग मशीन" असे नमूद करण्यात आले होते. परंतु तपासणी केल्यानंतर, 3.10 कोटी रुपयांचे डिस्क स्वरूपात 5.8 किलो सोने आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटरमध्ये लपवून ठेवलेले आढळले.

Gold Smuggling : 5.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, लखनौ आणि मुंबईतली मोडस ऑपरेंडी सेम
5.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्तImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 8:50 PM

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गेल्या आठवड्यात लखनौ आणि मुंबई येथे सलग दोन जप्ती करून हवाई मार्गाद्वारे सोन्याची तस्करी (Smuggling) करणाऱ्या रॅकेटचे प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले आहेत. या दोन्ही कारवाईत डीआरआयने 5.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 11 किलो सोने जप्त (Siezed) केले आहे. यामध्ये सोने लपवण्याची सामान्य पद्धत होती. याप्रकरणी दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासाच्या या मोहिमेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी शोधण्यात मदत झाली आहे. अशा कारवाईमुळे तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची DRI ची क्षमता अधिक मजबूत होतेय. 2021-22 मध्ये, DRI अधिकार्‍यांनी 833 किलो तस्करीचे सोने जप्त केले होते, ज्याची किंमत 405 कोटी रुपये होती.

ड्रेन क्लीनिंग मशीनमध्ये लपवले सोने

गुप्त माहितीच्या आधारे 6 मे रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (DRI) दुबईहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये आलेल्या एका मालाची तपासणी केली. डॉक्युमेंटमध्ये, या वस्तूंची “सेक्शनल आणि ड्रम प्रकारची ड्रेन क्लीनिंग मशीन” असे नमूद करण्यात आले होते. परंतु तपासणी केल्यानंतर, 3.10 कोटी रुपयांचे डिस्क स्वरूपात 5.8 किलो सोने आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटरमध्ये लपवून ठेवलेले आढळले. एक दिवस आधी 5 मे रोजी लखनौमध्ये डिआरआयने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाई करण्यात आली. लखनौ प्रकरणातही, डीआरआयने चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये “इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन” मध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते. सोन्याच्या चकत्या मशीनमध्ये लपवून ठेवलेल्या आढळल्या. या प्रकरणात 2.78 कोटी रुपये किंमतीचे एकूण 5.2 किलो सोने जप्त करण्यात आले.

2021-22 मध्ये, DRI अधिकार्‍यांनी 833 किलो तस्करीचे सोने जप्त

गेल्या वर्षभरात, डीआरआयने मालवाहू आणि कुरिअरच्या मालवाहतुकीतून नवी दिल्ली येथे करोडोंचे सोने जप्त केले आहे. जुलै 2021 मध्ये, DRI ने कुरिअर कन्सायनमेंटमधून 8 कोटी रुपये किमतीचे 16.79 किलो सोने जप्त केले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये एका मालवाहू कन्सायनमेंटमधून 80.13 किलो तस्करीचे सोने जप्त केले होते, ज्याची किंमत 39.31 कोटी होती. ऑगस्ट 2021 मध्ये आणखी एका प्रकरणात, डीआरआयला आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनल, मुंबई येथे आलेल्या एका मालामध्ये तस्करीचे सोने लपविण्यासाठी समान पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. डीआरआयने त्या आयात मालातून 5.25 किलो लपवून ठेवलेले सोने जप्त केले होते, ज्याची किंमत 2.67 कोटी रुपये आहे.

तपासाच्या या मोहिमेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी शोधण्यात मदत झाली आहे. अशा कारवाईमुळे तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची DRI ची क्षमता अधिक मजबूत होतेय. 2021-22 मध्ये, DRI अधिकार्‍यांनी 833 किलो तस्करीचे सोने जप्त केले होते, ज्याची किंमत 405 कोटी रुपये होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.