स्टेज ३ च्या कॅन्सर रुग्णाने केली तरुणीची हत्या, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला, काय कारण ?

स्वत: स्टेज ३ च्या कॅन्सर असलेल्या तरुणाने एका तरुणीला मारहाण करुन तिची हत्या करीत तिचा मृतदेह पेट्रोलने जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्टेज ३ च्या कॅन्सर रुग्णाने केली तरुणीची हत्या, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला, काय कारण ?
| Updated on: Aug 20, 2025 | 4:52 PM

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे नॅशनल हायवे ४८ जवळ एका १९ वर्षीय युवती वर्षिता हीच्या हत्येच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. हा आरोपी स्टेज ३ चा कॅन्सर पेशंट आहे. त्यानेच या युवतीला मारहाण करुन ठार केले आणि त्यानंतर तिचे प्रेत जाळल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने हा गुन्हा कबूल केला आहे.

वर्षिता हिरियूरच्या कोवरहट्टी गावातील रहिवासी होता. आणि चित्रदुर्गच्या एका सरकारी डिग्री कॉलेजात प्रथम वर्षाला होती. ती अनुसूचित जाती-जमातीच्या वसतीगृहात रहात होती. १४ ऑगस्टला वॉर्डनकडून तिने घरी जाण्यासाठी सुट्टी घेतली आणि हॉस्टेलच्या बाहेर निघाली त्यानंतर ती परत आलीच नाही, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळत असलेल्या अवस्थेत सापडला.

आरोपीने गुन्हा कबूल केला

पोलिसांनी या प्रकरणात चेतन नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तो तिसऱ्या स्टेज कॅन्सर रुग्ण आहे. चेतन यांनी वर्षिताच्या संपर्कात असल्याचे सांगितले. त्याने रागात तिला गोनूर येथे नेऊन मारहाण केली. जमीनीवर कोसळल्याने तिचा मृत्यू झाला वर्षिता हीचा मृतदेहावर त्याने पेट्रोल टाकून जाळले. या घटनेने वर्षिता कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत.

कुटुंबाचा आरोप

वर्षिता हीची आई ज्योती थिप्पेस्वामी हीने चेतन याला मुलीच्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. तिने सांगितले की हॉस्टेलच्या मुलींनी देखील चेतन याचे नाव घेतले आहे.वर्षिताच्या आईने चेतन याला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. तिचे वडील थिप्पेस्वामी यांनी न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हॉस्टेल व्यवस्थापनांवरही हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

कट रचून हत्या

वर्षिता हीचा नातलग प्रवीण यांनी ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. ती चार दिवसांपासून हॉस्टेलमध्ये नव्हती. आणि घरीही आली नव्हती.या पावसाच्या मोसमात तिचा मृतदेह जाळला. हा एक ठरवून केलेला गुन्हा वाटत असल्याचा आरोप त्याने केला आहे.