पंकजा मुंडे यांच्या घरासमोरची तीन घरे फोडली, चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ; माजी मंत्र्याचा एरियाही सुरक्षित नाही?

पंकजा मुंडे यांच्या घरासमोरील तीन घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे. माजी मंत्र्यांचं घर असलेल्या भागातही गुन्हा घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पंकजा मुंडे यांच्या घरासमोरची तीन घरे फोडली, चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ; माजी मंत्र्याचा एरियाही सुरक्षित नाही?
| Updated on: Sep 13, 2023 | 2:33 PM

परळी | 13 सप्टेंबर 2023 : राज्यातील गुन्ह्यांचं प्रमाण (crime news) दिवसेंदिवस प्रचंड वाढू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं गाव असलेल्या परळीमध्येही गुन्हे वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात लुटारूंचा धुमाकूळ असल्याचे चित्र समोर आले आहे. येथील वल्लभ नगर परिसरात सराईत चोरट्यांनी (theft)  घरफोड्या केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

परळीतील वल्लभ नगर भागात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थाना समोरच चोरीची ही घटना घडली आहे. चोरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन घरांमध्ये घुसून चोरी केल्याचे समोर आले आहे. घरात घुसल्यावर ज्या-ज्या मौल्यवान वस्तू सापडतील त्या -त्या घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. विशेष म्हणजे याच घरांसमोर पंकजा मुंडे यांचही निवासस्थान आहे. माजी मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या घरासमोरच्या परिसरात चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंत्र्यांच घर असलेला परिसरही असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. परळीतील वललभ नगर भागातच पंकजा मुंडे यांचं निवासस्थान आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून याचा अधिकार तपास पोलीस करीत आहेत.