AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health : शरद पवारांना कोणालाही भेटण्यास मनाई, हेल्थ रिपोर्ट समोर, तपासण्यातून काय समोर आलं?

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्राथमिक तापसण्यांचे काही रिपोर्ट आता समोर आले आहेत.

Sharad Pawar Health : शरद पवारांना कोणालाही भेटण्यास मनाई, हेल्थ रिपोर्ट समोर, तपासण्यातून काय समोर आलं?
sharad pawar health updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2026 | 5:16 PM
Share

अजिंक्य धायगुडे, टीव्ही 9 मराठी, पुणे : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. रुबी रुग्णालयात आल्यानंतर शरद पवार कारमधून उतरून व्हिल चेअरने रुग्णालयात गेले. दरम्यान, आता शरद पवार यांच्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे

नेमकी काय माहिती समोर आली?

शरद पवारांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. शरद पवार यांच्या प्राथमिक तपासण्यांचा अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर उपचार काय करावा, याचा निर्णय घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार केले जातील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्या तपासणी अहवालात नेमकं काय?

शरद पवार यांच्या प्राथमिक तपासण्यांचे काही रिपोर्ट समोर आले आहेत. सध्यातरी कोणतीही चिंतेची बाब नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच शरद पवार यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर प्रायव्हेट रुममध्ये उपचार केले जात आहेत. मॉनिटरवर दिसणाऱ्या मोजमापांनुसार शरद पवार यांच्या हृदयाचे ठोके (हार्ट रेट) सुमारे 74 प्रति मिनिट आहेत. हा रिपोर्ट प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य मर्यादेत आहे ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे 98 टक्के आहे. ही पातळी सामान्य असून रक्तातील ऑक्सिजन पुरेसा असल्याचे दर्शवते. श्वसनगती (रिस्पायरेटरी रेट) सुमारे 26 प्रति मिनिटे असून ही संख्या सामान्यपेक्षा जास्त आहे. प्रौढांसाठी हे प्रमाण साधारण 12–20 प्रति मिनिटे असते. म्हणजेच श्वसन वेग वाढलेला आहे. या आकडेवारीनुसार रुग्णाचे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर व समाधानकारक आहेत. मात्र, श्वसन वेग वाढलेला दिसतो, असे सांगण्यात येत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?