आफ्रिकन विद्यार्थ्यांना लाखों रुपयांना गंडा, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ

| Updated on: Nov 24, 2022 | 4:29 PM

नाशिकमध्ये दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना समोर येत असतांना परदेशी विद्यार्थ्यांसोबत झालेली फसवणूक चर्चेचा विषय ठरत असून पोलीसांनी यामध्ये तातडीने तपास केला आहे.

आफ्रिकन विद्यार्थ्यांना लाखों रुपयांना गंडा, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ
आर्थिक चणचणीतून विद्यार्थ्याची आत्महत्या
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांना लाखों रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन संशयितांपैकी एकाला नाशिक पोलीसांनी अटक केली आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आफ्रिकेतील काही विद्यार्थी हे नाशिकमध्ये शिक्षणसाठी आले आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या एका खाजगी महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहे. त्यांनी राहण्यासाठी नाशिकमधील काही ऑनलाइन दलालांची माहिती मिळवून संपर्क साधला होता. त्यानुसार गंगापूर रोड येथे त्यांनी या आफ्रिकन विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करून दिली होती. त्यानुसार ठरल्याप्रमाणे त्यांनी आठ विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतली होती. मात्र, ती रक्कम त्यांनी घरमालकाला न देता पोबारा केला आहे.

शिंगाडा तलाव येथे त्यांचे कार्यालय असल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली आहे. घरमालक अनामत रक्कम मिळाली नाही म्हणून पैसे मागण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिकमध्ये दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना समोर येत असतांना परदेशी विद्यार्थ्यांसोबत झालेली फसवणूक चर्चेचा विषय ठरत असून पोलीसांनी यामध्ये तातडीने तपास केला आहे.

हे सुद्धा वाचा

नव्याने रुजू झालेले नाशिक परीमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी याबाबत जलद गतीने तपास सुरू केला आहे, त्यामध्ये एकाला अटक करण्यात यश आले आहे.

आफ्रिकन येथील विद्यार्थी बाबालोला याने संशयित गणेश पाटील आणि निखिल मुदिराज यांना ऑनलाईन पेमेंट आणि रोख रक्कम दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

बाबालोला, डरायस गोल, डेटीमले एबार, डेविड डेमीने, बुसीने, रनाडोन, लॉरिनने, नोबर्ट अशा आठ आफ्रिकन तरुणांनी जवळपास दोन लाख 77 हजार रुपये दिले असून त्यांची यामध्ये फसवणूक झाली आहे.

हे सर्व विद्यार्थी व्यवसाय व्यवस्थापन पदवी मिळवण्यासाठी नाशिकमध्ये आले आहेत, त्यांची फसवणूक झाल्याने परदेशी व्यक्तींच्या सरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.