तीन मुस्लिम पती, एक लिव-इन पार्टनर…मग पुन्हा हिंदू मुलासोबत लग्न, कोण आहे ही चालाख नवरी?

26 ऑगस्ट रोजी मुलाकडच्यांनी वधू पक्षाला दोन लाख रुपये दिले. त्याचदिवशी भांडीरवन येथे एका वट वृक्षाखाली दोघांचं लग्न लावण्यात आलं. नवरा मुलगा वधूला आपल्या जावरा येथील घरी घेऊन आला.

तीन मुस्लिम पती, एक लिव-इन पार्टनर…मग पुन्हा हिंदू मुलासोबत लग्न, कोण आहे ही चालाख नवरी?
Marriage
Image Credit source: Representative Image
| Updated on: Sep 04, 2025 | 1:36 PM

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, जन्मोजन्मीचं नातं. लग्न करताना वधू-वर दोघांनी आपल्या डोळ्यात हजारो स्वप्न साठवलेली असतात. पण काहीजण लग्नाचा फसवणुकीसाठी, समोरच्याला लुटण्यासाठी वापर करतात. असच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणीने तीन मुस्लिम तरुणांना फसवलं. आधी निकाह केला. मग तिघांना सोडून दिलं. मग, एका युवकासोबत लिव-इन रिलेशनमध्ये राहू लागली. या दरम्यान तिने एका हिंदू मुलासोबत लग्न केलं. हे सर्व करताना तिने सत्य लपवलेलं. मधुचंद्राच्या दोन दिवसानंतर ती अचानक गायब झाली. पती तिचा शोध घेत होता. तेव्हा त्याला नवविवाहित पत्नीच सर्व सत्य समजलं. उत्तर प्रदेशच्या मथुरा पोलिसांनी या शातीर नवरीला अटक केली आहे.

मांट पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावातील हे प्रकरण आहे. इथल्या ढकू गावात राहणाऱ्या वीरेंद्रच लग्न होत नव्हतं. त्यावेळी गावातील एक महिला सुखरवीर आणि प्रवीणने वीरेंद्रच्या नातेवाईकांना सांगितलं की, आमच्या नजरेत एक युवती आहे. वीरेंद्रशी ती लग्न करेल. पण कुटुंब गरीब आहे. म्हणून त्यांना लग्नासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर त्यांनी युवती आणि वीरेंद्रची भेट घडवून आणली.

मधुचंद्राच्या दोन दिवसानंतर अचानक गायब

युवती अलीगढची असून तिचं नाव महेश आहे. 26 ऑगस्ट रोजी मुलाकडच्यांनी वधू पक्षाला दोन लाख रुपये दिले. त्याचदिवशी भांडीरवन येथे एका वट वृक्षाखाली दोघांचं लग्न लावण्यात आलं. नवरा मुलगा वधूला आपल्या जावरा येथील घरी घेऊन आला. दोन दिवस लग्नाचे कार्यक्रम चालले. नवऱ्यामुलाने सांगितलं की, मागचे दोन दिवस सर्वकाही सुरळीत होतं. पण मधुचंद्राच्या दोन दिवसानंतर अचानक रात्री नवीन नवरी निघून गेली.

कॉलेजजवळ जावेद सोबत पकडलं

मी आणि माझ्या कुटुंबाने नव्या नवरीचा शोध सुरु केला. त्यावेळी मुलगी आम्हाला एका कॉलेजजवळ जावेद नावाच्या एका युवकासोबत दिसली. आम्ही दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. पोलिसांमोर तिने सांगितलं की, तिचं खर नाव गुलबसा आहे. तिचं पहिल लग्न आगरा येथील फुरकान सोबत झालेलं. दुसरा निकाल फिरोजाबाद निवासी सलमानशी झालेला. तिसरा निकाह अलीगढ़ निवासी आमिरशी झालेला. त्यानंतर मी अलीगढ भुजपुरा निवासी जावेद सोबत रिलेशनशिपध्ये होती. आम्ही दोघे लिव-रिलेशनमध्ये आहोत. आम्ही पैशांसाठी वीरेंद्रला फसवलं. दोन लाख घेऊन मी जावेदकडे पुन्हा आली. पण पकडली गेली.