Bigg Boss 19 : आता सलमान खानवर जोक मारणार का? हात जोडत प्रणित म्हणाला..
Bigg Boss 19 : माझ्यामुळं जर कोणाचं पोट भरणार असेल तर... 'बिग बॉस 19' संपल्यानंतर प्रणित मोरे मारणार सलमान खान याच्यावर जोक? अखेर हात जोडत प्रणित म्हणाला..., व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

Bigg Boss 19 : आधी स्टँडअप कॉमेडी आणि त्यानंतर ‘बिग बॉस 19’ मध्ये झळकल्यानंतर प्रणित मोरे याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. प्रणित मोरे याने अनेक सेलिब्रिटींवर जोर केले… सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रणित याने अभिनेता सलमान खान याच्यावर देखील जोक केले… ‘सलमान खान याने अनेकांचं करियर संपवले आहेत…’ यावर देखील प्रणित याने जोक केले होते. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. एवढंच नाही तर, प्रणित मोरे याने मारलेला जोक सलमान खान याच्यापर्यंत देखील पोहोचला… यावर खुद्द सलमान खान याने देखील मोठं वक्तव्य केलं होतं…
बिग बॉस 19 च्या सुरुवातील प्रणित याने मारलेल्या जोकवर सलमान खान म्हणालेला, ‘माझ्यामुळं जर कोणाचं पोट भरणार असेल, घर चालणार असेल तर ते मला चालेल…’, असं म्हणत प्रणित याने भाईजानची माफी मागितली होती… तर, सलमान खान याने मोठ्या मनाने प्रणित याला माफ केलं होतं… आता बिग बॉस संपला आहे आणि प्रणित मोरे बाहेर आला आहे…
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सलमान खान याच्यावर जोक मारल्यामुळे प्रणित बिग बॉसमध्ये फार काळ टिकणार नाही.. असं देखील अनेकांनी म्हटलं. पण प्रणित टॉप 3 पर्यंत पोहोचला… आता शो संपल्यानंतर प्रणित याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या १९ व्या पर्वाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये प्रणित याला देखील स्पॉट करण्यात आलं. प्रणितला पाहताच पापाराझींनी विचारलं, ‘सलमान खान याच्यावर व्हिडीओ बनवणार का, सलमान खानवर जोक करणार का?’ यावर प्रणित म्हणाला, ‘मी आनंदी , खुश राहावं असं वाटत नाहीये का तुम्हाला? चांगले आहेत यार आपले सलमान भाऊ, खरंच खूप चांगले आहेत…’ सध्या प्रणित याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खानच्या ‘किक 2’ मध्ये प्रणित याची एन्ट्री?
‘बिग बॉस 19’ मध्ये सलमान खान याने ‘किक 2’ सिनेमाची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर, सिनेमासाठी प्रणित याला 100 टक्के संधी देईल… असं देखील भाईजान म्हणालेला. ‘किक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2009 मध्ये सिनेमा प्रदर्शित झालेला. तेव्हा सिनेमाने 402 कोटींची कमाई केली.
