AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पाटोदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले. या अपघातामध्ये घराच्याबाहेर उभ्या असलेल्या दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे.

Video | भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 2:39 PM
Share

बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले. या अपघातामध्ये घराच्याबाहेर उभ्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रोहिणी आणि मोहिनी असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.

चालक फरार

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका  गावात हा अपघात घडला आहे. भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्कार्पिओ चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

गावावर शोककळा

दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र वाहन भरधाव होते, भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. वाहनचालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

Cyber crime: सिमकार्ड बंद पडले म्हणून आला फोन, औरंगाबादच्या महिला वकिलाला 86 हजार रुपयांना गंडवले

Gold Smuggle | शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?