AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे...काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त
नाशिक जिल्ह्यात दारूची तस्करी उघड झाली आहे.
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 12:16 PM
Share

नाशिकः आपल्याला एक जुनी म्हण माहित असेल. अचाट खाणे न् मसणात जाणे. कोणतीही गोष्ट अती केली की, स्वतःसोबतच समाजालाही घातक ठरते. हेच पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, 15 लाखांचा दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक भरारी पथक त्र्यंबकेश्वर येथे गस्त घालत होते. तव्हा त्यांना एका चारचाकी वाहनातून दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचला. खबऱ्याने सांगितल्यानुसार एक संशयित चारचाकी वाहन आले. पथकाने ही पिकअप (एम. एच. 48 सी.बी. 0399) गाडी थांबवली. पिकअपमध्ये टोमॅटोचे कॅरेट ठवलेले होते. मात्र, पथकाला संशय आला. त्यांनी सारेच कॅरेट खाली उतरवून तपासणी केली. तेव्हा त्यात दारूचे बॉक्स सापडले. आता ही दारू बनावट आहे की, कशी हे अजून सांगितले नाही. मात्र, बनावट असेल, तर या हातभट्ट्या आणि कंपन्यावरही कारवाई करावी लागेल. अन्यथा विषारी दारूचे बळी जायला वेळ लागणार नाही.

दारूचे 112 बॉक्स जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या कारवाईत दारूचे 112 बॉक्स जप्त केले. वाहनासाह एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दीपक राजू नाईक (रा. त्र्यंबकेश्वर) आणि किशोर काशीनाथ मोरे (रा. पंचवटी, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त अर्जुन ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील देशमुक, अरुण चव्हाण, पी. बी. ठाकरू, एम. आर. तेलंग, हेमंत नेहरे, किरण कदम, गोकुळ परदेशी, विजेंद्र चव्हाण, रमाकांड मुंडे यांच्या पथकाने केली.

गुन्हेगारी वाढली

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मग ते बनावट नोटाप्रकरण असो की, एकाच आठवड्यात झालेले तीन खून असो की जिल्ह्यात गेल्याच महिन्यात पडलेले तीन दरोडे. यामुळे नाशिकच्या शांत प्रतिमेला तडा गेला आहे. पोलिसांनी सक्रिय राहून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शहराची अशीच प्रतिमा राहिली, तर उद्योजक इकडे फिरकणारही नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त

Sanjay Raut| हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात…देशाच्या जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.