Sanjay Raut| हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात…देशाच्या जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, मी राज्यातल्या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांकडे पाहतोय. पण आता त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेतेही त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलत आहेत. हे आम्ही पाहिलं. आम्हाला सगळ्यांना त्यांची दया आली आणि आश्चर्यही वाटलं.

Sanjay Raut| हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात...देशाच्या जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 11:47 AM

नवी दिल्लीः 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करण्यात आला. हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेलाही यावेळी जोरदार प्रत्यूत्तर दिले.

भ्रमित करणे सुरू…

संजय राऊत म्हणाले की, पुण्यामध्ये सत्य, न्याय याचीच गर्जना घुमलीय. तुम्ही टिळक पाहिले असतील किंवा त्यांच्या आधी अनेक संत, सज्जन पाहिले असतील. पण, अमित शाहजी काल पुण्यात आले. त्यांचे वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून आहे. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमितभाई नेमके खरे काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी, आमच्या भूमिकेविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजप नेत्यांमध्ये वैफल्य

राऊत म्हणाले, मी राज्यातल्या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांकडे पाहतोय. पण आता त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेतेही त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलत आहेत. हे आम्ही पाहिलं. आम्हा सगळ्यांना त्यांची दया आली आणि आश्चर्यही वाटलं. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही. सोडणार नाही. सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 ला शिवसेनेला दूर करा, असे राज्यातल्या भाजप नेत्याला खासगीत सांगणारे कोण होते. हे अमित शाह यांनी स्पष्ट करावं, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. ते असंही म्हणत आहे की राजीनामा देऊन वेगळे लढवून दाखवा. 2014 साली आम्ही वेगळेच लढलो होतो. प्रचंड ताकद, पैसा, केंद्रीय सत्ता याची कृत्रिम लाट असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेृतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने लढलो. चांगला विजय संपादन केला. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सर्व यंत्रणा फेल…

राऊत म्हणाले, शिवसेनेला दूर ठेवून महाराष्ट्राची संपूर्ण सत्ता काबीज करता यावी म्हणून कोणी कटकारस्थाने केली. याचं उत्तर पुण्यात जमेत नसेल, तर दिल्लीत द्यावं. आम्हालासुद्दा ट ला ट, फ ला फ, झ ला झ लावता येतं. महाराष्ट्राचे सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडालेला नाही. याचे दुःख आम्ही समजू शकतो. तुमच्या सर्व यंत्रणा फेल गेलेल्या आहेत. आपण म्हणताय ना, राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा. मी सांगतो तीन-तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना…सीबीआय, ईडी, एनसीबी….ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत. आम्ही असे पाठीमागून हल्ले-प्रतिहल्ले करत नाही. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. आम्हाला शिकवू नका समोरून लढा म्हणून. आम्ही समोरूनच लढतो. आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी शाह यांना उत्तर दिले.

इतर बातम्याः

Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

Election: ताई पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये होत्या, दादा 32 व्या नंबरचे मंत्री! पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोमणा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.