Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त

पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त
तुकाराम सुपे
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 11:43 AM

पुणे: पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी (MahaTET) परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर  छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे.

पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

जानेवारी 2020 च्या परीक्षेत गैरप्रकार

महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

तुकाराम सुपे यांच्या घरुन यापूर्वी 90 लाखांचा ऐवज जप्त

तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

कोट्यवधी रुपये घेतल्याची कबुली

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने 1 कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 1 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं होतं.

इतर बातम्या

MIDC Recruitment : आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटीनंतर एमआयडीसी भरतीवर प्रश्नचिन्ह, पुणे पोलिसांकडे विद्यार्थी दाद मागणार

TET Exam : टीईटी परीक्षेतील गैरप्रकराची व्याप्ती वाढणार? तत्कालीन शिक्षणमंत्र्याचे ओएस, पीएस संशयाच्या भोवऱ्यात?

Pune Police seized 2 crore and gold from Tukaram Supe and his relative house

Non Stop LIVE Update
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....