VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डायरेक्ट ब्रोकर ट्रान्सफर योजना आणली. पण महाविकास आघाडीने त्याचा अर्थ डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर असा घेतला, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर चढवला होता.

VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 11:03 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डायरेक्ट ब्रोकर ट्रान्सफर योजना आणली. पण महाविकास आघाडीने त्याचा अर्थ डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर असा घेतला, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर चढवला होता. शहा यांच्या या हल्ल्याला संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं. आम्हाला शिकवू नका, असं जोरदार प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना अमित शहा यांच्यावर टीका केली. शहांनी कालच्या भाषणात महाविकास आघाडीला डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर म्हणत हिणवलं. याबाबत राऊत यांना विचारले असता राऊत प्रचंड भडकले. हे असे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं. हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हाला सांगू नका. महाराष्ट्राचं सरकार उत्तम चाललं आहे. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडाला नाही याचं दु:ख आम्ही समजू शकतो. तुमच्या सर्व यंत्रणा फोल गेल्या आहेत, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

तीन चिलखत बाजूला ठेवून या मैदानात

तुम्ही म्हणता ना राजीनामा द्या आणि मैदानात या. मी सांगतो तुम्ही जी तीन तीन चिलखतं घालून महाराष्ट्रात फिरताय ना… सीबीआय, ईडी आणि एनसीबी हे तीन चिलखत घालून तुम्ही आमच्याशी लढताय ना… ही चिलखतं दूर करून आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेऊन लढणारे आहोत. आम्ही असे पाठीमागून हल्ले प्रतिहल्ले करत नाही. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. आम्हाला शिकवू नका. आम्ही समोरूनच वार करतो, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचं कारस्थान कुणाचं होतं?

यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही शहा यांना घेरलं. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. 25 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. हिंदुत्ववादी होतो. असं असताना 2014च्या निवडणुकीत शिवसेनेला बाजूला सारा असं कोण म्हणालं होतं. शिवसेनेला दूर ठेवण्याचं कट कारस्थान कुणाचं होतं? महाराष्ट्राची सत्ता काबीज करता यावी, सत्तेचा जास्तीत जास्त वाटा मिळावा म्हणून कुणाचा प्रयत्न सुरू होता. पुण्यात या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील तर दिल्लीत जाऊन द्यावी, असं आव्हानच राऊत यांनी शहांना दिलं.

संबंधित बातम्या:

शाह म्हणाले, राजीनामा देऊन मैदानात या, आता राऊतांचं जशास तसं उत्तर, शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य?

Election: ताई पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये होत्या, दादा 32 व्या नंबरचे मंत्री! पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोमणा

TET Exam : टीईटी परीक्षेतील गैरप्रकराची व्याप्ती वाढणार? तत्कालीन शिक्षणमंत्र्याचे ओएस, पीएस संशयाच्या भोवऱ्यात?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.