शाह म्हणाले, राजीनामा देऊन मैदानात या, आता राऊतांचं जशास तसं उत्तर, शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य?

शाह म्हणाले, राजीनामा देऊन मैदानात या, आता राऊतांचं जशास तसं उत्तर, शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य?
अमित शाह आणि संजय राऊत.

संजय राऊत यांंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ईडी, सीबीआय हे भाजपचे चिलखत आहे. मात्र, त्यामुळे आम्हाला कसलाही फरक पडत नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 20, 2021 | 10:35 AM

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी थेट पुण्यात येऊन राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. राजीनामा देऊन मैदानात या, असे म्हणत शिवसेनेला डिवचले. याचे चोख प्रत्यूत्तर सोमवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य, म्हणत शाह यांना चिमटा काढला. यामुळे येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध शिवसेना सुरू झालेले वाकयुद्ध आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगेल यात शंकाच नाही.

शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी प्रवरानगर येथे हजेरी लावल्यानंतर काल पुण्यात कार्यक्रम केले. यावेळी बोलताना शाह यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवर शरसंधाण साधण्याची संधी सोडली नाही. शाह म्हणाले, पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असे म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असे खुले आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे याची सोमवारी सव्याज परतफेड केली आहे.

तीन-तीन चिलखतं घालून फिरतायत…

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडालेला नाहीय. याचे दुःख आम्ही समजू शकतो. तुमच्या सर्व यंत्रणा फेल गेलेल्या आहेत. आपण म्हणताय ना, राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा. मी सांगतो तीन-तीन चिलखत घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना…सीबीआय, ईडी, एनसीबी….ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत. आम्ही असे पाठीमागून हल्ले-प्रतीहल्ले करत नाही, असा शब्दांत त्यांनी शाह यांना सुनावले.

शिवसेनेशिवाय 105 जागा अशक्य

राऊत म्हणाले, शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. आम्हाला शिकवू नका समोरून लढा म्हणून. आम्ही समोरूनच लढतो. आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत, असे जोरदा प्रत्युत्तर राऊत यांनी दिले. विधानसभेच्या निवडणुकीत 50-50 टक्के सत्तेचे सूत्र ठरले होते, या वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपला 105 जागा अशक्य आहे, असे म्हणत वाढत्या इंधन किमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले.

इतर बातम्याः

Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

Dattatray Ware : आदर्श मॉडेल ठरलेल्या वाबळेवाडीच्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारेंचं निलंबन, पुणे जिल्हा परिषदेची कारवाई, हे आहे कारण

पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें