पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?

हे बाळ कोणाचं आहे, याचा लवकरच शोध घेतला जाईल. बालिका पूर्णपणे सुरक्षित आहे. तिची पूर्ण काळजी घेतली जात आहे. बाळाला नेमकं कोणी सोडलं, तिच्या आईनेच त्याला टाकलं, की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 8:15 AM

रांची : नुकत्याच जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडून पाषाणहृदयी आई निघून गेली. छत्तीसगडमधील मुंगेली शहरातून ही काळजाला घरं पाडणारी बातमी समोर आली आहे. नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी बाळाला वाचवलं, अन्यथा कुत्र्यांनी त्याचा फडशा पाडण्याची भीती होती. कदाचित रात्रभर हे अर्भक कुत्र्यांच्या पिल्लांसोबत होतं, मात्र त्याला साधं खरचटलंही नाही. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमने बालकाला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

छत्तीसगडमधील मुंगेली शहरातील लोरमी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सारीसताल गावात ही हृदय हेलावणारी घटना घडली. कोणीतरी एका दिवसाच्या नवजात बालकाला गावाच्या मधोमध असलेल्या चौकात सोडून गेलं होतं. गावकऱ्यांनी याची माहिती लोरमी पोलिसांना दिली. एएसआय चिंताराम बिंझवार पोलिसांच्या साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारांनंतर बाळाला मुंगेलीतील चाईल्ड केअरला रेफर करण्यात आलं. सध्या बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.

एक दिवसाची मुलगी

लोरमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी सूचना दिल्यावर सारीसताल गावात एका नवजात अर्भक सापडलं. ती केवळ एका दिवसाची मुलगी आहे. डॉक्टरांनी तिला मुंगेलीतील चाईल्ड केअर सेंटरमध्ये दाखल केलं आहे, या प्रकरणी कुठलीही केस दाखल करण्यात आलेली नाही. तपास सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

बाळाच्या आई-वडिलांचा शोध

हे बाळ कोणाचं आहे, याचा लवकरच शोध घेतला जाईल. बालिका पूर्णपणे सुरक्षित आहे. तिची पूर्ण काळजी घेतली जात आहे. कदाचित रात्रभर ती कुत्र्यांच्या पिल्लांसोबत होती, मात्र तिला जराशीही दुखापत झालेली नाही. बाळाला नेमकं कोणी सोडलं, तिच्या आईनेच त्याला टाकलं, की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित बातम्या :

महिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार

बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट जीवावर बेतला; पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.