Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या
प्रातिनिधीक फोटो

युनूस रमाशंकरच्या घरी येणे जाणे सुरु झाले. रमाशंकरच्या घरी येत जात असतानाच युनूसचे त्याच्या पत्नीशी सूत जुळले आणि दोघांचे अनैतिक संबंध निर्माण झाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 19, 2021 | 11:25 PM

सुलतानपूर : मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे घडली आहे. युनूस असे मयत तरुणाचे नाव असून तो टॅक्सी चालक होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या दिरांना ताब्यात घेतले असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

अनैतिक संबंध जीवावर बेतले

करौंडीकलन येथील हिंदुाबाद गावातील रहिवासी रमाशंकर आणि अयोध्या जिल्ह्यातील मंगवां येथील रहिवासी युनूस दोघेही मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर होते. एकत्र काम करीत असल्यामुळे दोघांमध्ये मेत्रीचे संबंध होते. याच मैत्रीमुळे युनूस रमाशंकरच्या घरी येणे जाणे सुरु झाले. रमाशंकरच्या घरी येत जात असतानाच युनूसचे त्याच्या पत्नीशी सूत जुळले आणि दोघांचे अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण घरांच्यानाही लागली. त्यामुळेच महिलेच्या दिरांनी युनूसचा काटा काढला. मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे युनूसच्या जीवावर बेतले आहे.

मारहाणीत युनूसचा मृत्यू, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अयोध्या जिल्ह्यातील मंगवां येथील रहिवासी युनूस शनिवारी रात्री करौंडी कला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदूबागमध्ये आपल्या प्रेयसीला म्हणजेच रमाशंकरच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता. रमाशंकरच्या भावांना युनूस आपल्या वहिनीला भेटण्यासाठी आल्याचे कळले. यामुळे संतापलेल्या रमाशंकरचे भाऊ लाठ्या घेऊन युनूस आपल्या वहिनीला ज्या ठिकाणी भेटणार होता त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी युनूसला लाठ्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत युनूसचा मृत्यू झाला. याबाबत करौंडी कला पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कृपाशंकर आणि शिव शंकर अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस हत्येप्रकरणी पुढील कारवाई करीत आहेत. (In Uttar Pradesh, a young man was beaten to death in an immoral relationship)

इतर बातम्या

Barabanki: गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक

Hariyana Crime: चार वर्षाच्या मुलीसह पित्याची चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ज्याने संपूर्ण हरियाणा हादरले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें