Gold Smuggle | शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या

केनियाच्या नागरिक असलेल्या 18 महिला नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) भारतात आल्या होत्या. शॉरमा, कॉफीच्या बाटल्या, बूट यातून त्यांनी सोन्याचे लहान बार लपवून आणले होते.

Gold Smuggle | शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:20 PM

मुंबई : मुंबईतील कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Air Intelligence Unit) 18 केनियन (Kenyan) महिलांना ताब्यात घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) रविवारी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1.55 कोटी रुपये किमतीचे 3.85 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. शॉरमा (Shawarmas), कॉफीच्या बाटल्या, शूज यांच्यामधून सोन्याची तस्करी करण्यात येत होती. धक्कादायक म्हणजे काही जणींनी अंतर्वस्त्रातही पावडर स्वरुपात सोनं लपवलं होतं.

काय आहे प्रकरण?

केनियाच्या नागरिक असलेल्या 18 महिला नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) भारतात आल्या होत्या. शॉरमा, कॉफीच्या बाटल्या, बूट यातून त्यांनी सोन्याचे लहान बार लपवून आणले होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या अंडरगारमेंट्समध्येही काही सोने सापडले. सर्व जणी एकाच फ्लाईटने प्रवास करत होत्या.

एका महिलेला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटने आतापर्यंत एका महिलेला अटक केली आहे. परवानगीयोग्य मर्यादेपेक्षा अधिक सोने बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर उर्वरित 17 महिलांना ताब्यातील सोने जप्त करुन सोडून देण्यात आले. या महिला कुठल्याही स्मगलिंग रॅकेटचा भाग नसल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलं आहे.

जास्त दराने मुंबईत सोने विक्री

‘या महिला गरीब कुटुंबातील आहेत. केनियात सोन्याच्या किमती स्वस्त असल्याने तिथे त्यांनी सोनं विकत घेतलं होतं. मुंबईत सोन्याचे भाव प्रचंड जास्त असल्याने चढ्या दराने विकण्याचा त्यांचा प्लॅन होता’ असं सूत्रांनी सांगितलं.

तस्करी होणारे सोने बहुतांश वेळा दुबई किंवा शारजातील असते, मात्र आफ्रिकन देशांतूनही सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढत आहे. गेल्याच महिन्यात दुबईहून 1.71 किलो वजनाचे 77 लाख रुपये किमतीचे सोने तस्कर केल्याप्रकरणी दोघा प्रवाशांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Doctor Murder | गरम जेवण वाढण्यावरुन वाद, दिराने डॉक्टर वहिनीचा जीव घेतला

भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!

 मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.