AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!

नटून-थटून आलेल्या नातलगांच्या कुजबूज होती. यजमानी स्वागताच्या गडबडीत होते. लग्नाचा उत्साह दोन्हीकडच्या नातलगांमध्ये होते. अशातच लग्न लागयच्या नेमक्या क्षणी नवऱ्याच्या मुलाच्या वडिलांनी 10 लाख रुपये कॅश हुंडा मागितला आणि वातावरणं चांगलंच तापलं.

Video | भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!
मंडपातच नवऱ्याला लाथा-बुक्क्यांचा आहेर
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 11:16 AM
Share

गाझियाबाद : लग्नाच्या (Marriage) मंडपातच नवरीच्या नातलगांनी नवऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल (Ghaziabad Viral Video) झाला आहे. दरम्यान, हे सगळं प्रकरण नंतर पोलीस (Police) स्टेशनपर्यंत पोहोचलं. यानंतर उलटपक्षी नवऱ्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.

नवऱ्याला मारहाण आणि त्याच्यावर एफआयआर, असं का?

गाझियाबादच्या साहिबाबबादमधली ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. साहिबाबादमध्ये (Sahibabad Groom Viral Video) एक लग्न होतं. लग्नाची वरात आली होती आग्राहून. धूमधडाक्यात नवऱ्यामुलाचं स्वागत नवरीमुलीच्या नातलगांनी केलं. सनई-चौघड्यांचं बॅकग्राऊंड मंद म्युझिक सुरु होतं. नटून-थटून आलेल्या नातलगांच्या कुजबूज होती. यजमानी स्वागताच्या गडबडीत होते. लग्नाचा उत्साह दोन्हीकडच्या नातलगांमध्ये होते. अशातच लग्न लागयच्या नेमक्या क्षणी नवऱ्याच्या मुलाच्या वडिलांनी 10 लाख रुपये कॅश हुंडा मागितला आणि वातावरणं चांगलंच तापलं. नवऱ्यामुलाच्या वडिलांनी सांगितलं की पैसे नाही दिले, तर लग्न लावणार नाही!

लाथाबुक्क्यांचा आहेर

नवऱ्यामुलाच्या वडिलांनी केलेल्या या मागणीनंतर अखेर नवरी मुलीचे वडील नरमले. त्यांनी 3 लाख रुपये कॅश आणि एक लाख रुपयांची अंगठी आधीच दिली होती. पण तेवढ्यावरच नवऱ्या मुलाच्या वडिलांचं समाधान झालं नव्हतं! ते 10 रुपये कॅशच्या अटीवर अडून राहिले. बराच वेळ त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते. पण नवरी मुलीकडच्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटला आणि सुरु झालं घमासान. नवरी मुलीच्या नातलगांनी नवरदेवालाच हुंड्यात चांगलाच प्रसाद (Groom Beaten Before Marriage Video) द्यायला सुरुवात केला. लाथा-बुक्क्या-धक्के-बाचाबाची-असं सगळं सुरु झालं.

किस्सा इथंच संपत नाही!

या सगळ्यात आगीत तेल ओतावं, अशी आणखी गोष्ट घडली. ती म्हणजे ज्या मुलाशी लग्न लावलं जाणार होतं, त्याची आधीच दोन-तीन लग्न झालेली असल्याची धक्कादायक बाब मुलाकडच्यांनी लपवून ठेवली होती. तेही मुलीकडच्यांना या सगळ्या राड्यादरम्यान कळलं! यानंतर आग्राहून आलेली वरात नवरी मुलकडच्यांनी थेट पोलीस स्टेशनातच नेली आणि या सगळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली.

नवऱ्याची यशेच्छ धुलाई

नवऱ्याची यशेच्छ धुलाई

हुंडा देणं-घेणं गुन्हाच!

आता पोलीसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक चौकशी केली जाते आहे. फसवणूक करुन हुंडा मागणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयावर आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. हुंडा देणं आणि घेणं हा खरंतर कायद्यानं गुन्हा आहे. मात्र तरिही सर्रासपणे अजूनही हुंड्यापायी लग्न मोडणं, जुळवणं, असले प्रकार सुरु असल्याचंही या निमित्तनं स्पष्ट झालंय.

पाहा व्हिडीओ – 

इतर बातम्या – 

Viral | ढसाढसा रडत व्हायोलीन वाजवत असलेल्या मुलाची काळीज पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी गोष्ट

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!

Video: ‘भावा, लवकर जमिनीवर उतरव, माझं लग्न व्हायचंय अजून’, पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.