Video: ‘भावा, लवकर जमिनीवर उतरव, माझं लग्न व्हायचंय अजून’, पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 14, 2021 | 11:56 AM

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी पॅराग्लायडिंगला करत आहे, अचानक ती मुलगी वर गेल्यावर घाबरू लागते आणि यादरम्यान ती पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलाशी बोलू लागते.

Video: 'भावा, लवकर जमिनीवर उतरव, माझं लग्न व्हायचंय अजून', पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल!
तरुणीचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ
Follow us

तुम्हाला पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ आठवत असेल, जो हवेत गेल्यानंतर इतका घाबरला होता की, त्याला काय करावं सुचत नव्हतं. हा व्हिडीओ 2019 सालचा होता…जो प्रकार मनालीत घडला होता. ज्यात हा व्यक्ती 500 रुपये जास्त घे, पण जमिनीवर उतरव असं म्हणत होता. भाई लँड करा दे…हे वाक्य त्यावेळी चांगलंच फेमसझालं होतं. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुणी पॅराग्लायडिंग करताना घाबरलेली दिसत आहे. मात्र, या दरम्यान ती जे बोलते, ते ऐकूण तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. (Viral Funny Video of Girl paragliding funny video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी पॅराग्लायडिंगला करत आहे, अचानक ती मुलगी वर गेल्यावर घाबरू लागते आणि यादरम्यान ती पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलाशी बोलू लागते. या मुलीची वाक्य ऐकून तुम्ही पोट धरून हसायल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, मुलगी त्या मुलाला म्हणते की, ‘भावा, माझं लग्नही झालेलं नाही.’ आधी लग्नाचा विषय काढून आणि त्यात मुलाला भाऊ म्हणून तिने मुलाचा पत्ता कट केल्याचं नेटकरी म्हणतात. तुम्हाला वाटत असेल विषय इथंच संपला, पण मजा पुढे आहे, तो मुलगाही म्हणतो, माझं पण लग्न झालेलं नाही. त्यावर ती मुलगी म्हणते, तुझं लग्न झालेलं नाही, पण मला तर लग्न करायचं आहे ना!

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप पसंत केला जात आहे. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्यात हिंमत नसताना पॅराग्लायडिंगसाठी गेले की असं काहीतरी होतं?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘तरुणीला इथं जबरदस्तीने आणलेलं दिसतंय, उंचीची भीती वाटत असेल तर इथं आलीच का?.’ या मजेदार व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

आधीचा व्हायरल झालेला व्हिडीओ:

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधीही एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक महिला खूप ओरडताना आणि तिच्या जोडीदाराला उतरण्यासाठी वारंवार विनंती करताना दिसत होती. हा व्हिडीओ सर्वांनाच खूप आवडला होता.

हेही पाहा:

Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस थेट बर्फाळ तलावात उतरले, त्यानंतर काय झालं पाहा..

Video: बादशाहच्या गाण्यावर एअर होस्टेसचे भन्नाट डान्स मुव्ह्ज, नेटकरी आयतच्या अदांवर घायाळ!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI