AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस थेट बर्फाळ तलावात उतरले, त्यानंतर काय झालं पाहा..

हा व्हिडिओ स्पेनच्या उत्तरेकडील भागातील आहे. एका कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस बर्फाळ तलावात उतरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस थेट बर्फाळ तलावात उतरले, त्यानंतर काय झालं पाहा..
कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस तलावात उतरले
| Edited By: VN | Updated on: Dec 14, 2021 | 11:36 AM
Share

सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे की, जिथं खूप आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की, ते तुमचे मन जिंकतात. अनेकदा तुम्ही प्राण्यांचे रेस्क्यू व्हिडीओ पाहिले असतील, जे पोस्ट होताच लगेच व्हायरल होतात. सध्या पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकत आहे. या व्हिडिओमध्ये 2 पोलिस एका कुत्र्याला वाचवताना दिसत आहेत. जेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे, तो लोकांना इतका आवडला आहे की, आता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ( Viral Video of Police officers rescue a dog from a frozen reservoir Animal Rescue Video)

माहितीनुसार, हा व्हिडिओ स्पेनच्या उत्तरेकडील भागातील आहे. एका कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस बर्फाळ तलावात उतरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तलावात अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तलावात एक पोलीस पुढे सरकत असताना दुसरा पोलीस त्याला मदत करत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.

व्हिडीओ पाहा:

या घटनेनंतर स्पॅनिश पोलिसांनी सांगितले की, हा कुत्रा मंगळवारी स्पेनच्या पूर्वेकडील कॅनफ्रँकच्या जलाशयात अनेक तासांपासून अडकला होता, ज्याला 2 पोलिसांनी वाचवलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, पोलिस कर्मचाऱ्यांनी खरोखरच कौतुकास्पद काम केलं आहे. आणखी एका युजरने लिहिले, या दोन पोलिसांनी अप्रतिम काम केले. तिसऱ्या यूजरने लिहिले, मी अशा पोलिसांना सलाम करतो.

बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच लोकांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला जात आहे. कुत्र्याला वाचवून त्या व्यक्तीने जगभरातील लोकांची मनं जिंकली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही पाहा:

Video: बादशाहच्या गाण्यावर एअर होस्टेसचे भन्नाट डान्स मुव्ह्ज, नेटकरी आयत अदांवर घायाळ!

Video: टॉय ट्रॅक्टरने चिमुरड्याने अख्खा जेसीबी ओढला, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून आमचा दिवस आनंदात गेला!

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?