AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शेजारी देशात हाहाकार; थेट मंत्र्यांचं घर पेटवलं, नेमकं काय घडतंय?

भारताच्या शेजारी देशात हाहाकार माजला आहे. बांगलादेशच्या थेट मंत्र्यांचं घर पेटवलं आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारताच्या शेजारी देशात हाहाकार; थेट मंत्र्यांचं घर पेटवलं, नेमकं काय घडतंय?
bangladeshImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 3:39 PM
Share

भारतात मागील काही वर्षांपासून राहत असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेशमध्ये परतण्याआधी गदारोळ माजला आहे. त्यांच्या घरवापसीआधी बांग्लादेश पेटला आहे. हसीना शेख यांच्या पक्षाने लॉकडाऊन आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर बांगलादेशमधील अनेक शहरात हिंसा भडकली आहे. बांगलादेशमध्ये एक मंत्र्याचं घर देखील पेटवण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या शेजारी देशात सुरक्षा व्यवस्थेवरून हाहाकार माजला आहे.

बांगलादेशच्या सिलहटच्या दरियापारा भागात असलेले परराष्ट्र मंत्री हुमायूं कबीर यांच्या घराचा मुख्य दरवाजा पेटवून देण्यात आला. परंतु या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी स्पष्ट केलं की, कोणीही गेटवर पेट्रोल बॉम्बद्वारे हल्ला केलेला नाही. काही समाजकटंकांनी पॉलीथीन पेटवून आग लावण्याचा प्रयत्न केलाय. मंत्री कबीर यांच्या घराला आग लावली. घराच्या दरवाजा पेटवल्याचा पुरावा पाहायला मिळतोय

पोलीस आयुक्त अफजल हुसैन यांनी सांगितलं की, कोणीही सकाळच्या सुमारास पॉलीथीनचा वापर करून मेन गेटवर आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मंत्र्यांच्या मेन गेटवर राख देखील मिळाली. मंत्र्यांच्या घराच्या मेन गेटजवळील दोन घरांना आग लागल्याचे आढळून आले. या घराच्या जवळच एक पोलीस चौकी आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी मंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

अवामी लीगद्वारे पुकारलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशमधील अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी गावठी बॉम्बच्या मदतीने हल्ले करण्यात आले. शहरात जागोजागी आग लावण्यात आली. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित दोन नेत्यांचा मृत्यू झाला. तर दोन इतर लोकांचाही जीव गेला. बांगलादेशमध्ये हिंसाचारात एकूण 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.  अवामी लीगने पुकारलेल्या आंदोलनात हिंसक घटनेवरून बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी टीका केली आहे. अवामी लीगचे समर्थक देशात अशांतता पसरवण्यासाठी जाळपोळ आणि हत्या घडवून आणत आहेत. आता जनतेने एकजूट होऊन दहशतवाद, हत्या आणि निवडणुकीसाठी चुकीचं राजकारण करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं तारिक यांनी आवाहन केलं.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर