Delhi Murder : पहिलीला न सांगता दुसरा विवाह केला, दोघींनी मिळून त्यालाच आयुष्यातून उठवला; पतीच्या हत्येसाठी 15 लाखांची सुपारी

| Updated on: Jul 10, 2022 | 11:27 PM

संजीव नजमाशी वाईट वागायचा. तसेच नजमाला संजीव आधीच विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत, हे कळले. त्यामुळे दोन्ही पत्नींनी एकमेकांशी संगनमत करुन संजीवला आयुष्यातून उठवण्याचा कट रचला.

Delhi Murder : पहिलीला न सांगता दुसरा विवाह केला, दोघींनी मिळून त्यालाच आयुष्यातून उठवला; पतीच्या हत्येसाठी 15 लाखांची सुपारी
दिल्लीत दोन पत्नींकडून मिळून पतीची हत्या
Follow us on

दिल्ली : दोन विवाह करुन फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मिळून पतीची सुपारी देऊन हत्या (Murder) केल्याची घटना दिल्लीतील गोविंदपुरी भागात घडली आहे. या हत्येसाठी दोन शूटरला 15 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. संजीव कुमार असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. संजीव कुमार यांची 6 जुलै रोजी गोळ्या झाडून (Firing) हत्या करण्यात आली होती. संजीव कुमार यांच्या दोन पत्नी आणि त्यांच्या एका मुलीने मिळून हा कट रचला होता. पोलिसांनी आरोपी नजमा गीता देवी आणि तिच्या मुलीला अटक केली आहे. पोलीस दोन्ही शूटरचा शोध घेत आहेत. संजीव नजमाशी वाईट वागायचा. तसेच नजमाला संजीव आधीच विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत, हे कळले. त्यामुळे दोन्ही पत्नींनी एकमेकांशी संगनमत करुन संजीवला आयुष्यातून उठवण्याचा कट रचला. यानंतर सुपारी देऊन हत्या करण्यात आली.

हत्या करुन अपघाताचा बनाव केला

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी पोलिसांना संजीव कुमार नावाच्या व्यक्तीचा अपघात झाल्याची बातमी मिळाली होती. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि पत्नीही उपस्थित होत्या. त्यांची पत्नी गीता उर्फ ​​नजमा यांनी पोलिसांना सांगितले की, ती भाजी आणण्यासाठी जात होती, त्याच दरम्यान अपघात झाला आणि पतीचा मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार संजीव कुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांना नजमावर संशय आला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. नजमाने सुरवातीला पोलिसांची दिशाभूल केली आणि डीटीसी कर्मचार्‍यांनी पती संजीव कुमार यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगत राहिली.

पत्नी आणि मुलीसोबत भाजी आणायला गेला असता गोळ्या झाडल्या

पोलिसांनी डीटीसी चालक आणि कर्मचाऱ्याची अनेकदा चौकशी केली, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी नजमाचा मोबाईल तपासला. त्या मोबाईलमधून एक फोटो डिलीट करण्यात आला होता. हा फोटो दुचाकीचा होते. नजमा यांची कडक चौकशी केली असता तिने अखेर सत्य उलगडले. तिने आणि संजीवच्या पहिल्या पत्नीने मिळून इक्बाल आणि नईम नावाच्या दोन शूटरला या हत्येसाठी 15 लाख रुपयांची सुपारी दिली होती. यानंतर 6 जुलै रोजी नजमा, तिची मुलगी आणि संजीव कुमार दुचाकीवरुन भाजी आणण्यासाठी गेले. तेथे आरोपी आधीच संजीवची वाट पाहत होते. त्यांनी संजीवची गोळ्या झाडून हत्या केली. (Two wifes shot dead their husbands with a sharpshooter in Delhi)

हे सुद्धा वाचा