Hariyana MLA Threat : …तर मूसेवाला सारखी परिस्थिती होईल, हरियाणातील काँग्रेस आमदाराला धमकी

तक्रारीनंतर पतौडी येथे पाच अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 148 (दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 323 (हानी करणे), 452 (घरात घुसखोरी), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि शस्त्र कायदा कलम 25-54-59 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Hariyana MLA Threat : ...तर मूसेवाला सारखी परिस्थिती होईल, हरियाणातील काँग्रेस आमदाराला धमकी
कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 6:19 PM

हरियाणा : गँगस्टर केलेल्या टिप्पणीवर संतप्त झालेल्या गुंडांनी झज्जरमधील बदली येथील काँग्रेस आमदार कुलदीप वत्स (Kuldeep Vatsa) यांच्या घरात घुसून धमकी (Threaten) दिल्याची घटना घडली आहे. गुंडांनी वत्स यांच्या कूकला मारहाण (Beating) केली आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालालाही सोडले नाही, आमदारांनीही काळजी घ्यावी, असे या गुंडांनी कूकला सांगितले. त्यानंतर हे पाचही आरोपी शेताकडे निघून गेले. कुकच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी पतौडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, हल्लेखोरांची माहिती अद्याप मिळालेली नाही. एसटीएफ या प्रकरणाची चौकशी करेल. धमक्या देणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले.

तक्रारीनंतर पतौडी येथे पाच अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 148 (दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 323 (हानी करणे), 452 (घरात घुसखोरी), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि शस्त्र कायदा कलम 25-54-59 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कूकमार्फत आमदाराला धमकी

उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत राज्यातील पाच आमदारांना गुंडांकडून धमक्या आल्या आहेत. राजीव असे वत्स यांच्या कूकचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढचा रहिवासी आहे. तो गुरुग्राममधील पटौडी येथील आमदार कुलदीप वत्स यांच्या घरी स्वयंपाकी आहे. शुक्रवारी दुपारी तो घरी एकटेच असताना गेट ठोठावल्याचा आवाज आला. गेट उघडण्यासाठी गेला असता पाच गुंड जबरदस्तीने आत घुसले आणि बंदुक दाखवत आमदार कुलदीप वत्स कुठे आहेत? असे विचारले. आमदार अजून आलेले नाहीत, असे कुक राजीवने त्यांना सांगितले. त्यावर आमदारांना त्या लोकांबद्दल जास्त बोलू नका, असे सांग असे बदमाशांनी सांगितले. आम्ही मुसेवाल्यालाही सोडले नाही, तेव्हा त्यांनीही स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. कूकने हल्लेखोरांना प्रतिकार केल्यावर गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यांनी कमरेला पिस्तुल लावले. संपूर्ण घराची झडती घेतल्यानंतर आरोपी शेतातून पळून गेले.

हे सुद्धा वाचा

दहशत पसरवण्यासाठी धमकी

माझे कोणाशीही वैर नाही. आपल्याला पहिल्यांदाच धमकी देण्यात आली आहे. आरोपींना राज्यात दहशत पसरवायची आहे, पण आपण घाबरत नाहीत, असे आमदार कुलदीप वत्स यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले.

संजयसिंगला धमकी देणारा फरार

सोहना येथील आमदार संजय सिंह यांना परदेशी क्रमांकाने धमकी देणाऱ्या बदमाशाचा अद्याप शोध लागलेला नाही. गुंड नीरज बवाना टोळीचा सदस्य बनून आमदाराकडे पाच लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Haryana Congress MLA Kuldeep Vats threatened to kill by goons)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.