आधी ओढलं, खांबाला बांधलं आणि मग हाण हाण हाणलं! नवऱ्याची बायकोला अमानुष मारहाण, व्हिडीओही व्हायरल

नवरा बायकोमधील वादातून नवरा अनेकदा बायकोला मारहाण करत होता.

आधी ओढलं, खांबाला बांधलं आणि मग हाण हाण हाणलं! नवऱ्याची बायकोला अमानुष मारहाण, व्हिडीओही व्हायरल
आग्रामधील धक्कादायक घटना
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 21, 2022 | 12:01 PM

नवरा बायकोमधील भांडण विकोपाला जाऊन नवऱ्याने बायकोला (Wife beaten) जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल (Video Viral) झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) आगरा येथील असल्याची माहिती समोर आली असून पोलीस आता आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत. अत्यंत अमानुष अशी मारहाण नवऱ्यानं बायकोला केली. आधी त्याने आपल्या बायकोला रस्त्यावरुन ओढत आणलं, त्यानंतर तिला एक खांबाला बांधलं आणि नंतर काठीने हाण हाण हाणलं. अंगावर काटा आणणारी ही अत्यंत निर्दयी मारहाण सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून फरार नवऱ्याचा शोध सुरु आहे. नवऱ्यानं संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं जातंय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, याबाबतही पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशात आगरा येथील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरसेना नावाचं एक गाव आहे. या गावात एक दाम्पत्य राहतं. या दाम्पत्यामध्ये सतत वाद होत होते. नवरा बायकोमधील वादातून नवरा अनेकदा बायकोला मारहाण करत होता. दरम्यान, नवऱ्याची मारहाण असह्य होऊन अखेर एकदा बायकोनं पोलिस तक्रार दाखल केली. यानंतर बायकोची पोलीस स्थानकात जाऊन तक्रार देण्याची हिंमतच कशी झाली, यावरुन नवरा अधिकच संपातला आणि त्यानं रागाच्या भरात बायकोचा निर्दयीपणे बेदम मारहाण केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण करण्यात आलेल्या महिलेचं नाव कुसुमा देवी आहे. 17 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न श्याम बिहारी यांच्याशी झालं होतं. श्याम बिहारी हे अरसेना गावचे रहिवासी आहेत. पीडित कुसुमा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतीला दारुचं व्यसन आहे. दारु पिण्यास पतीला विरोध केला, तर तो मारहाण करतो, असा आरोपही त्यांनी केला आहे. 13 जुलै रोजीही कुसुम यांना श्याम बिहाारी यांनी मारहाण केली होती. त्यानंतर कुसुमा देवी यांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घरी आल्यानंतर कुसुम यांना त्यांचा पती श्याम बिहारी बेदम मारहाण केली. कुसुम यांना एका खांबाला बांधून श्याम बिहारीने त्यांना एका काठीने निर्दयीपणे अमानुष मारहाण केली. त्यानंतर याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियात व्हायरलही केला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.