Video : गोळी हवेत झाडायची होती, पण नवरदेवाने चुकून मित्रावरच झाडली! सैनिक मित्र जागीच ठार, नवरदेवाला अटक

UP Crime News : वरातीत हवेत बंदुकीनं गोळीबार करण्याचे प्रकार अनेकदा उत्तर प्रदेशात घडलेले आहेत .

Video : गोळी हवेत झाडायची होती, पण नवरदेवाने चुकून मित्रावरच झाडली! सैनिक मित्र जागीच ठार, नवरदेवाला अटक
धक्कादायक
Image Credit source: Twitter Video Grab
| Updated on: Jun 24, 2022 | 7:05 AM

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh crime News) एक विचित्र घटना घडली. हवेत गोळी झाडण्यासाठी नवरदेवाने मित्राकडून बंदूक घेतली. हवेच्या दिशेनं गोळी झाडण्यासाठी हातही केली. पण गोळी लागली नाही म्हणून हात खाली केली आणि ट्रिगर दाबला गेला. यात ज्याच्याकडून हवेत गोळी (Gun Shot) झाडण्यासाठी बंदूक घेतली होती, त्या मित्रालाच गोळी लागली आणि तो जागच्या जागी ठार झाला. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील एका वरतीत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. गोळीबार ठार झालेला नवरदेवाचा मित्र हा सैनिक होता. त्याचं नाव बाबूलाल असल्याचं कळतंय. आता बाबूलालच्या हत्येप्रकरणी (UP Murder) नवरदेवाला अटकही करण्यात आली आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. वरातीत हवेत बंदुकीनं गोळीबार करण्याचे प्रकार अनेकदा उत्तर प्रदेशात घडलेले आहेत . फक्त वरातीतच नव्हे, तर वेगवेगळ्या मिरवणुकांमध्येही शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतून हवेत गोळीबार केले जातात. आता मंगळवारी यूपीत घडलेल्या या घटनेटा थरार पाहून काळजाचा ठोका चुकलाय.

पाहा व्हिडीओ :

दुर्दैवी

बाबूलाल यादव असं सैनिकाचं नाव असून त्यानेच आपल्या मित्राला हवेत गोळी झाडण्यासाठी बंदूक दिलेली होती. 38 वर्षांच्या बाबूलाल यादव यांचा यात मृत्यू झाला. आपला मित्र मनिषच्या लग्नासाठी बाबूलास सुट्टी काढून खास घरी आले होते. त्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्सही होतं. काश्मिरमध्ये पोस्टिंगवर असलेले बाबूलाल या वरातीत घडलेल्या घटनेत ठार झालेत.

बाबूलाल यादव हे त्यांच्या घरातील कर्ता पुरुष होते. बाबूलाल यांच्या अकाली मृत्यूनं यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी यादव कुटुबीयांकडून पोलिसात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी कारवाई केली आहे. नवरदेव असलेल्या मनिष यानं गोळी झाडल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या भर वरतीत घडलेल्या या थरारक प्रसंगानं सगळेच हादरुन गेलेत.