ठाकरेंना प्रतिज्ञापत्र देताना बनावट स्टॅम्पचा वापर; मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कारवाई

शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाकरेंना प्रतिज्ञापत्र देताना बनावट स्टॅम्पचा वापर; मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कारवाई
vanita kamble | Updated on: Oct 09, 2022 | 2:58 PM

दीपेश त्रिपाठी, tv9 मुंबई  : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना झटका देणारी आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने यासदर्भात मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा आणखी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईत एक मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी वांद्रे, माहिम परिसरात धाड सत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र हस्तगत केली आहेत.

शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे.
ठाकरेंना पाठिंबा देताना प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली. या प्रतिज्ञा पत्रांसाठी बनावट आयकार्डचा वापर करण्यात आला.

 

Follow Us