‘नवरा तर नवरा, दीर आणि नणदेचा नवरा सुद्धा…’ रडत रडत पत्नीने उघड केलं सासरचं डर्टी सिक्रेट, पोलीसही ऐकून सुन्न

एका विवाहित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये येऊन सासरच डर्टी सिक्रेट उघड केलं. ते ऐकून पोलीसही काही क्षणांसाठी सुन्न झाले. तिने सासरकडच्या मंडळींची पोल-खोल केली. या महिलेने पोलिसांना असं काय धक्कादायक सांगितलं, जाणून घ्या.

नवरा तर नवरा, दीर आणि नणदेचा नवरा सुद्धा... रडत रडत पत्नीने उघड केलं सासरचं डर्टी सिक्रेट, पोलीसही ऐकून सुन्न
wife revealed dirty secret
Image Credit source: Representative Image
| Updated on: Jul 26, 2025 | 10:15 AM

साहेब! माझा पतीच नाही, दीर आणि नणदेचा नवरा सुद्धा रोज माझ्यासोबत…इतकं सांगून एक विवाहितेच्या अश्रुचा बांध फुटला. पोलिसांनी तिला आराम खुर्चीवर बसवलं व सांगितलं, आता आम्हाला काय झालं ते नीट सांग. त्यावेळी महिलेने तिच्यासोबत जे घडलय ते सांगितलं, ते ऐकून पोलीसही क्षणभरासाठी सुन्न झाले. महिलेने सांगितलं की, सासरी तिच्यावर बलात्कार केला जातो. मारहाण तर सामन्य गोष्ट झाली आहे. सासरची माणसं उलट तिलाच बडबडतात. मन हेलावून टाकाणारी ही घटना उत्तर प्रदेश अलीगढची आहे.

महिलेने पती आणि दीराविरुद्ध SSP कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत महिलेने पती, दीर आणि नणदेच्या नवऱ्याच्या कृत्यांची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

नणदेचा नवरा सुद्धा कमी नाही

SSP ऑफिसमध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर महिला म्हणाली की, तिचा नवरा तिच्यासोबत चुकीची काम करतो. दीरावरही तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप केला. तो जबरदस्ती करतो. नणदेचा नवरा सुद्धा कमी नाही असा आरोप महिलेने केला. तो सुद्धा माझ्यासोबत अश्लील हरकती करत असतो, असं महिला म्हणाली. माझ्यासोबत चुकीचं घडतय. कुटुंबात यावर कोणी काही करायला, बोलायला तयार नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे आली आहे, असं पीडित महिला म्हणाली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिलेने आरोप केला की, तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. लग्न झाल्यापासून तिचा छळ होतोय. नवऱ्याने दोघांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप तिने केला. तो व्हिडिओ तो त्याच्या मित्रांना दाखवतो, असं महिलेच म्हणणं आहे. मी घरच्यांना या बद्दल सांगितल्यानंतर नवऱ्याने ब्लॅकमेलिंग सुरु केलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो. बराच वेळ मी गप्प बसली, पण अजून किती गप्प बसू?. सहन करण्याची माझी क्षमता संपली होती. घरात कोणी माझं ऐकत नव्हतं. मोठी हिम्मत करुन मी इथे आली आहे, मला माहितीय पोलीस मला न्याय मिळवून देतील असं पीडित महिलेने म्हटलं.