
एक नवीन खळबळजनक हत्याकांड समोर आलं आहे. रोशनी ऊर्फ नाजने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. ज्या मुलीचा तिने बर्थ डे साजरा केला, तिचीच तिने हत्या केली. हत्येच कारण समजल्यानंतर पोलीसही सून्न झाले. 6 वर्षाच्या सायनारा ऊर्फ सोनीने आई रोशनीला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना बघितलं होतं. पती घरी नसताना रोशनीच हे सर्व सुरु होतं. सोनी त्यावेळी आईला म्हणजे रोशनीला म्हणाली की, मी हे सर्व पप्पांना सांगीन. आईने आधी तिला आमीष दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकली नाही. पण सोनी ऐकायला तयार नव्हती. अखेर रोशनीने सोनीची गळा आवळून हत्या केली. बॉयफ्रेंडने या मध्ये तिला साथ दिली. त्यानंतर दोघांनी मृतदेह बेडमध्ये टाकला. उत्तर प्रदेशनच्या लखनऊमध्ये हे हत्याकांड घडलं.
त्याच बेडवर रोशनीने बॉयफ्रेंड उदित जायस्वाल सोबत नंतर दारु पार्टी केली. ड्रग्स घेतले. त्याच बेडवर झोपून गेली. मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागल्यानंतर रोशनीने सोनीचा मृतदेह बाहेर काढला. AC जवळ नेऊन मृतदेह ठेवला. त्यावर परफ्यूम मारला. लादी फिनायलने धुतली. त्यानंतर रोशनीन या हत्येचा आरोप पती शाहरुखवर टाकण्याचं प्लानिंग केलं.
हत्या किती तास आधी झालेली?
रोशनीने त्यानंतर पोलिसांना फोन केला. बोलली, साहेब माझा पती माझ्या मुलीची हत्या करुन पळून गेलाय. पण खोटं पकडलं गेलं. पोलिसांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना समजलं की मृतदेह जुना वाटतोय. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्या 36 तास आधी झाल्याचा खुलासा झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
शाहरुख तिथे आलाच नव्हता
त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. शाहरुखचे डिटेल्स काढले. त्यातून समजलं की, मुलीची हत्या झाली, त्यावेळी शाहरुख बहिणीच्या घरी होता. इतकच नाही, हत्या चौथ्या मजल्यावर झाली. शाहरुख तिथे आलाच नव्हता. पोलिसा्ंनी रोशनी आणि तिचा बॉयफ्रेंड उदितला पकडलं.
प्लानिंग काय होतं?
उदितने सांगितलं की, आम्ही शाहरुखला फसवण्यासाठी रात्री प्लानिंग केलं. रोशनीने शाहरुखला बोलवून घेतलं. तिथे दोघांमध्ये भांडण झालं. शाहरुख निघून गेला. त्यानंतर रोशनीने पोलिसांना फोन करुन ही हत्या शाहरुखने केलीय असं सांगितलं. पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की, घटना चौथ्या मजल्यावर घडलीय. शाहरुख तिथे गेलाच नव्हता. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच उदित सर्व काही बोलला. दोन्ही आरोपी आता तुरुंगात बंद आहेत.