‘माझी पत्नी पाकिस्तानी हेर’, बिझनेसमॅनच्या आरोपाने एकच खळबळ

लोकेश राठीने सांगितलं की, पत्नी 2020 साली होळीच्या प्रसंगी माहेरी मथुरेला गेली होती. तिथून ती परतलीच नाही. पत्नीला शोधण्यासाठी नोएडाच्या सेक्टर-39 मध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

माझी पत्नी पाकिस्तानी हेर, बिझनेसमॅनच्या आरोपाने एकच खळबळ
Representative Image
| Updated on: Jul 02, 2025 | 12:35 PM

उत्तर प्रदेश नोएडा येथे एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीवर ती पाकिस्तानी हेर असल्याचा आरोप केला आहे. माझी पत्नी अनेकवेळा पाकिस्तान आणि चीनला जाऊन आलीय असं या व्यावसायिकाने म्हटलं आहे. लग्नानंतर तीन महिन्यात पत्नी बेपत्ता झाली, तिचा शोध अजूनही मी घेतोय. पण तिचा शोध लागत नाहीय असं या पाकिस्तानी व्यावसायिकाने म्हटलं. त्याने या प्रकरणात पोलीस चौकशीची मागणी केली आहे.

नोएडाच्या सेक्टर 105 मधील जज कॉलोनीत राहणाऱ्या लोकेश राठी यांनी आपल्या पत्नीविरोधात दिल्ली आणि नोएडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. एवढच नाही, केंद्र सरकारला पत्र पाठवून पत्नीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. 6 वर्षांपूर्वी लोकेशच लग्न मुथरा येथे राहणाऱ्या मुलीसोबत झालं होतं. मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून डिसेंबर 2019 मध्ये लग्न झालं. मार्च 2020 मध्ये लोकेशची पत्नी बेपत्ता झाली.

पासपोर्टची सुद्धा चौकशी करण्याची मागणी

लोकेश राठीने सांगितलं की, पत्नी 2020 साली होळीच्या प्रसंगी माहेरी मथुरेला गेली होती. तिथून ती परतलीच नाही. पत्नीला शोधण्यासाठी नोएडाच्या सेक्टर-39 मध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. महिलेचा शोध सुरु केला, तेव्हा अनेक सिक्रेट समोर आलीत. लोकेशने पत्नीच्या पासपोर्टची सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पत्नीच पहिलं लग्न कोणासोबत?

लोकेश राठी यांचा दावा आहे की, त्यांची पत्नी अनेकदा पाकिस्तानात जाऊन आली आहे. 2004 साली पत्नी चीनला गेली होती. शिक्षणासाठी ती तिथे गेली होती. लोकेशने सांगितलं की, पत्नीच पहिलं लग्न 2008 साली झालेलं. पाकिस्तानातील अतीक नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं. दोघांना एक मुलगा आहे. तो पाकिस्तानात असतो. चीनमध्ये असताना ती पाकिस्तानात गेलेली. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ तिथे थांबलेली असं लोकेशच म्हणणं आहे.

पत्नीने लोकेशवर काय आरोप केलेला?

पत्नीच्या पाकिस्तानात येण्या-जाण्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली असं लोकेशने सांगितलं. पत्नीने लोकेश विरोधात घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. हुंड्यासाठी छळ केल्याच आरोपपत्रात म्हटलं होतं. याला लोकेशने हायकोर्टात आव्हान दिलेलं. घरगुती हिंसाचार प्रकरणात सुनावणीवेळी हजर न राहण्याचा पत्नीवर आरोप आहे.