हो, ‘त्या’ हेतूनेच महिला अंतर्वस्त्रांची चोरी, दोघा चोरट्यांची धक्कादायक कबुली

| Updated on: Mar 17, 2021 | 4:02 PM

मेरठमधील सदर बाजार भागात राहणारे काही तरुण हे परिसरातील तरुणींच्या अंडरगार्मेंट्सची चोरी करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. (Girls Under Garments Lingerie Theft)

हो, त्या हेतूनेच महिला अंतर्वस्त्रांची चोरी, दोघा चोरट्यांची धक्कादायक कबुली
महिला अंतर्वस्त्रांची चोरी करणारे दोन तरुण
Follow us on

लखनौ : घराबाहेर वाळत घातलेल्या महिला अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. फहीम अब्बासी आणि आशिक अली यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मेरठ पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाई केली. (Uttar Pradesh Police nabs Two Youth for Girls Under Garments Lingerie Theft)

पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे कपडे हस्तगत केले आहेत. वाईट हेतूनेच आपण महिलांची अंतर्वस्त्र चोरल्याची कबुली चोरांनी दिली आहे. तंत्र मंत्र विद्या किंवा अंधश्रद्धेतून अंतर्वस्त्रांची चोरी होत असल्याची शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती. सोमवारी पोलिसांनी फहीम अब्बासीची धरपकड केली. तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आशिक अलीला बेड्या ठोकल्या.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरांची धरपकड

अंतर्वस्त्रांच्या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. स्थानिकांनी हे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना उपलब्ध करुन दिले. यामध्ये दोन तरुण अंतर्वस्त्रांची चोरी करताना स्पष्ट दिसत होते. या चोरीमागे तरुणांच्या काही सुप्त लैंगिक इच्छा आहेत, की तंत्र मंत्र विद्या, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.

मेरठमधील सदर बाजार भागात राहणारे काही तरुण हे परिसरातील तरुणींच्या अंडरगार्मेंट्सची चोरी करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. किमान डझनभर लोकांनी अंतर्वस्त्रांची चोरी झाल्याची तक्रार देऊन पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.

उत्तर प्रदेशातील विचित्र घटनेच्या आठवणी

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये असाच एक विचित्र प्रकार घडला होता. मुजफ्फरनगरमध्ये 24 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि भू-माफियांविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या एका शिक्षकावर पोलिसांनी विचित्र कारवाई केली होती. विजय सिंह या शिक्षकावर पोलिसांनी उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

दुसरीकडे, अमेरिकेच्या मिन्नासोटा राज्यातही एक असाच विचित्र नियम आहे. तिथे महिला आणि पुरुषांची अंतर्वस्त्रे एकत्र वाळत घालण्यावर बंदी आहे.

संबंधित बातम्या :

उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याने शिक्षकावर गुन्हा, जगभरातील 11 विचित्र बंदी

सोन्या-चांदीची नाही, गाड्यांचीही नाही, हे लुटारु काय लुटतायत बघा? पोलीसही अवाक

(Uttar Pradesh Police nabs Two Youth for Girls Under Garments Lingerie Theft)