Accident : रात्री ड्रायव्हिंग करताना डोळा लागल्यानं भीषण अपघात, 10 जण जागीच ठार

| Updated on: Jun 23, 2022 | 9:24 AM

Uttar Pradesh Accident : या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात आलंय.

Accident : रात्री ड्रायव्हिंग करताना डोळा लागल्यानं भीषण अपघात, 10 जण जागीच ठार
भीषण अपघात..
Image Credit source: Twitter
Follow us on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Accident) भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात लोक गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. जखमींवर बरेलीमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत लखीमपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. हरिद्वारहून लखीमपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहन झाडावर (Road accident) आदळलं. ही धडक इतकी जोरदार होती जागीच 10 लोकांचा मृत्यू (10 people killed) झाला. अपघाताच्या आजूबाजूला जंगल परिसर असल्यानं बचावकार्यालाही उशीर होतोय. चालकाचा डोळा लागल्यानं हा अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारात ही दुर्घटना घडली. गजरौल पोलीस टाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. अपघातातील सर्वजण हे लखीमपूरच्या गोला कसबा इथं राहणारे होते. या घटनेनं मृतांच्या कुटुंबीयांना दुःखाचा डोंगर कोसळलाय.

10 ठार, 7 जखमी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांतून जागीच मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे रक्तबंबाळ झालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. शिवाय जखमींनाही तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. सात जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर बरेलीच्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

वाहनाचा चक्काचूर

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात आलंय. तसंच जिल्हा प्रशासनालाही या घटनेवर नजर ठेवून योग्य ती मदत करण्याचेही निर्देश देण्यात आलेत. या अपघातामध्ये वाहनाचा तर अक्षरशः चक्काचूर झालाय. एका सिक्स सीटर गाडीतून प्रवासी निघाले होते. त्यादरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली.

दुसरा भीषण अपघात

नुकतीच बुधवारी हमीरपूरमध्ये एक भीषण दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेमध्ये एक लोडर आणि रिक्षामध्ये धडक होईल तब्बल आठ जणांचा जीव गेला होता. यात एका पाच वर्षांच्या मुलासह दोन महिलांचाही समावेश होते.