Dhurandhar : ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवनकडे दुर्लक्ष ? स्पष्टच बोलला अभिनेता ..
अक्षय खन्नाला सगळा स्पॉटलाईट, सगळी प्रसिद्धी मिळाल्याने तू नाराज आहेस, यावर आर माधवनने थेट उत्तर दिलं. चित्रपटातील भूमिका, अक्षयचं काम आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी यावर त्याने स्पष्ट मत मांडलं.

दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर’ची (Dhurandhar) सगळीकडेच चर्चा आहे. 5 डिसेंबरला म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाची अजूनही तूफान घोडदौड सुरू असून बॉक्स ऑफीसवरही चित्रपट तगडी कमाई करतोय. या चित्रपटाने 400 कोटींचा गल्ला पार केला असून जगभरातही भरपूर कमाई होत आहे. सर्वसामान्य प्रेक्षक आणि सेलिब्रिटी, नेतेही या चित्रपटाची भरपूर तारीफ करत आहेत. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असली तर सध्या धुरंधर गाजतोय तो अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) रेहमान डकैतमुळे. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होत असून अनेकांनी त्याला ऑस्करच देण्याची मागणी केली आहे.
या चर्चांदरम्यान या चित्रपटात अजय संन्याल यांची भूमिका साकारणारा अभिनेता आर.माधवन (R. Madhvan) याची प्रतिक्रिया समोर आली आहे. चित्रपटात अक्षयच्या कामाचं झालेलं प्रचंड कौतुक यामुळे आर. माधवन कुठेतरी झाकोळला गेला , नजरअंदाज झाला का? या प्रश्नावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
अक्षय खन्नाबद्दल काय म्हणाला माधवन ?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, आर माधवनला विचारण्यात आलं, काही लोक असं म्हणत आहेत अक्षय खन्नाला सगळा स्पॉटलाईट, सगळी प्रसिद्धी मिळाल्याने तू नाराज आहेस, यावर त्याने थेट उत्तर दिलं. नाराजीच्या सर्व चर्चा त्याने फेटाळून लावल्या. ‘ बिल्कुल नाही. मी अक्षयसाठी यापेक्षा अधिक आनंदी होऊ शकत नाही. तो जे कौतुक डिझर्व्ह करतो, ते त्याला मिळालचं पाहिजे ‘ असं माधवन याने सांगितलं.
पुढे अक्षय खन्नाचं कौतुक करत तो म्हणाला की तो (अक्षय) खूप “टॅलेंटेड” और “डाऊन टू अर्थ” (नम्र) अभिनेता आहे. एवढंच न्वहे तर लाईमलाइटपासून लांब राहण्याच्या त्याच्या स्वभावाचं माधवनने कौतुकही केलं. अक्षयच्या प्रसिद्धीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना आर. माधवन म्हणाला की, “तो तर कितीतरी मुलाखती देऊ शकतो. पण तो घरी बसून त्याला नेहमीच हवी असलेली शांती अनुभवत आहे.”
पब्लिक अटेंशनशी असलेल्या नात्याबद्दल माधवन म्हणाला की, “जेव्हा लोकांचे लक्ष वेधले गेले तेव्हा मला वाटायचे की मी एक अंडरडॉग व्यक्ती आहे. पण अक्षय खन्ना वेगळ्या पातळीवर आहे. त्याला काही फरक पडत नाही. यश आणि अपयश त्याच्यासाठी सारखेच आहेत.” असं माधवनने सांगितलं.
कोणतीही जेलसी, इर्षा वाटत नाही, असं काहीच नसल्याच सांगत त्याने सर्व अफवा फेटाऊव लावल्या. धुरंधरचा भाग असणं, त्या चित्रपटाशी जोडलं जाणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. “अक्षय किंवा दिग्दर्शक आदित्य धर यांनाही यशाचा फायदा घेण्यात रस नाही.” असंही तो म्हणाला.
